शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निलंबितांविरुद्ध ३ महिन्यांत दोषारोपपत्र दाखल न झाल्यास होणार निलंबन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 22:00 IST

सेवा नियमावलीच्या तरतुदी बदल; अन्यथा निलंबन होणार समाप्त

ठळक मुद्देयाबाबत पुन्हा बुधवारी निर्देश जारी करण्यात आले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.त्यांचे निलंबन समाप्त होवून पुन्हा सेवेत रुजू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

जमीर काझीमुंबई - शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विविध कारणास्तव निलंबित झालेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब आहे. त्यांच्यावरील दोषारोप पत्र विभागाला कोणत्याही परिस्थितीत ३ महिन्याच्या कालावधीत दाखल करावे लागणार आहे. अन्यथा त्यांचे निलंबन समाप्त होवून पुन्हा सेवेत रुजू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात दिलेल्या आदेशानुसार निलंबित सेवा नियमावलीच्या तरतुदीमध्ये हा बदल करण्यात आला आहे.त्यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्याच्या नियमाची काटकोरपणे अंमलबजावणी करण्याची सूचना सामान्य प्रशासन विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह(एसीबी)सर्व खात्यांना दिल्या आहेत. याबाबत होणाऱ्या दिरंगाईमुळे निलंबितांना कामाविना फुकटचा मोबदला द्यावा लागतोच,शिवाय कालांतराने त्यांचा निलंबित कालावधीही सेवेत गृहित धरला जातो. त्यामुळे याबाबत पुन्हा बुधवारी निर्देश जारी करण्यात आले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.लोकसेवक म्हणून काम करीत असताना गैरकृत्य किंवा पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्याला निलंबित केले जाते. यामध्ये प्रामुख्याने विभागातर्गंत प्रकरणासह लाचलुचपत विभागाच्या कारवाईचे प्रमाण अधिक आहे. फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यामध्ये संबंधितांना अटक होवून ४८ तास किंवा त्याहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) कलमानुसार आपसुक निलंबन होते. त्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी, गुन्ह्याचा सविस्तर तपास करुन त्याचे ९० दिवसाच्या आत दोषारोपपत्र बनवावे लागते. त्यावर संबंधित अधिकारी,कर्मचारी ज्या विभागात कार्यरत आहे,त्या प्रमुखाची मंजुरी घेवून न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे लागते. मात्र अपवाद वगळता बहुतांश प्रकरणामध्ये निर्धारित मुदतीमध्ये दोषारोप पत्र दाखल होत नसल्याची परिस्थिती आहे. इतकेच नव्हे तर काही प्रकरणात तपास अधिकाऱ्याकडून त्याबाबत संबंधितांचे जबाब नोंदविण्याचे कामही होत नाही. त्यामुळे निलंबित व्यक्ती विभागाकडे अर्ज करुन पुन्हा सेवेत रुजू होण्यास पात्र ठरतो.निलंबिताविरुद्ध ३ महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल झाल्यास त्याच्या गुन्ह्याचे स्वरुपाचा विचार करुन त्याचा निलंबन कालावधी वाढविता येतो, किंवा न्यायालयीन खटल्याच्या अधीन राहून त्याला सेवेत पुर्न:स्थापित करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र दोषारोप पत्रच दाखल न झाल्यास त्याचे सेवा निलंबन समाप्त होते, त्यामुळे त्याला पुन्हा सेवेत घेणे बंधनकारक बनले आहे. त्यामुळे जे खरोखर कसुरवार आणि पदाचा गैरवापर करणारे अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांना या दिरंगाईचा फायदा होतो, ते पुन्हा ताठमानेने सेवेत रुजु होतात, त्यामुळे निलंबितांविरुद्धचे आरोपपत्र कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्धारित ९० दिवसाच्या आत सादर करण्याची सूचना सर्व शासकीय विभागांना तसेच एसीबीला करण्यात आलेली आहे.एसीबीची शेकडो प्रकरणे प्रलंबितगेल्या काही वर्षात एससीबीने लाचखोरावर कारवाईचा धडाका लावला असलातरी त्यांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात दिरंगाई झालेली आहे. शेकडो प्रकरणाची आरोपपत्रे तयार झालेली नाहीत, किंवा त्यांना विभाग प्रमुखांकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे निर्धारित मुदतीमध्ये कार्यवाही न झाल्याने अनेक लाचखोरांना पुन्हा सेवेत हजर करुन घेणे भाग पडत आहे.

आरोपपत्र मंजुरीसाठी शासन व सक्षम अधिकाऱ्यांकडील प्रलंबित प्रकरणे दिवसापेक्षा कमी ९० दिवसापेक्षा जास्त एकूण शासन सक्षम

टॅग्स :suspensionनिलंबनPoliceपोलिसcommissionerआयुक्तMaharashtraमहाराष्ट्र