सस्पेन्स कायम! मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांची उद्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 09:47 PM2020-02-28T21:47:02+5:302020-02-28T21:48:33+5:30

नव्या आयुक्तांच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. 

Suspense still! New Mumbai Police Commissioner announced tomorrow pda | सस्पेन्स कायम! मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांची उद्या घोषणा

सस्पेन्स कायम! मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांची उद्या घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देबर्वे यांना शनिवारी सकाळी आठ वाजता मुंबई पोलीस दलातर्फे निरोप देण्यात येणार आहे. सरकारला रजनीश सेठ यांची नियुक्ती करावयाची झाल्यास आयुक्तपदाचा दर्जा कमी करावा लागणार आहे. 

मुंबई - मुंबईचे पोलीस आयुक्तसंजय बर्वे उद्या निवृत्त होत असून त्यांच्या पदी कोणाची नियुक्ती केली आहे याबाबत शुक्रवारी म्हणजेच आज रात्रीपर्यंत झालेली नव्हती. शनिवारी सकाळी त्याबाबतचा आदेश जारी केला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. नव्या आयुक्तांच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. 


एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग, सुरक्षा महामंडळाचे महासंचालक डी.कनकरत्नम आणि अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, बर्वे यांना शनिवारी सकाळी आठ वाजता मुंबई पोलीस दलातर्फे निरोप देण्यात येणार आहे. नायगावच्या मैदानवर पारंपरिक पध्दतीने हा कार्यक्रम होणार आहे. परमबीर सिंग याचे नाव आघाडीवर आहे. मात्र, सरकारला रजनीश सेठ यांची नियुक्ती करावयाची झाल्यास आयुक्तपदाचा दर्जा कमी करावा लागणार आहे. 

Web Title: Suspense still! New Mumbai Police Commissioner announced tomorrow pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.