शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

वाहनचालकाकडून चिरीमिरी घेणारे दोन वाहतूक पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 20:00 IST

नो पार्किंगमध्ये कार उभी करणा-या वाहन चालकाबरोबर दंडाच्या रकमेबाबत तडतोड करून चिरीमिरी घेणा-या वाहतूक शाखेच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देकार चालकाकडून ५०० रुपये घेतले, नो पार्किंगमध्ये उभी केली होती गाडी वाहनचालकाकडून चिरीमिरी घेणारे दोन वाहतूक पोलीस निलंबित

पुणे : नो पार्किंगमध्ये कार उभी करणा-या वाहन चालकाबरोबर दंडाच्या रकमेबाबत तडतोड करून चिरीमिरी घेणा-या वाहतूक शाखेच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. 

        दिनेश गजघाटे आणि मंगेश जाधव अशी निलंबित केलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयांची नावे असून ते बंडगार्डन वाहतूक विभागात कार्यरत आहेत. वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा बदनाम होत असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेच्या नवनियुक्त पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी ही कारवाई केली. गजघाटे आणि जाधव या दोघांनाही २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २ दरम्यान आरटीओ चौकात वाहतूक नियमनासाठी नेमण्यात आले होते. त्यानंतर दुपारी ३ वाजता कृष्णा जन्मोत्सवानिमित्त इस्कॉन मंदिर येथे वाहतूक नियमन करावे, अशा सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र ते इस्कॉन मंदिर येथे न जाता आरटीओ चौकातच थांबले. सायंकाळी सहा वाजता एक चारचाकी चौकात येऊन थांबली होती. त्यावेळी दोघेही कारजवळ जाऊन गाडी नो पार्किं गमध्ये का थांबविली अशी वाहनचालकाकडे विचारणा केली.

       गजानन बुधवंत (रा. बाणेर) यांची ती गाडी होती. त्यानंतर ई चलन मशिनवर कारचा नंबर टाकून गाडीची माहिती घेतली. त्यावेळे त्यांना ती कार पासिंग झालेली नसल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी वाहनचालक बुधवंत यांच्याकडे दंडापोटी ६ हजार रुपयांची मागणी केली. मात्र एवढे पैसे नसल्याचे सांगत बुधवंत हे तडतोडी अंती ५०० रुपये देऊन निघून गेले. हा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर दोघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.  चिरीमिरी घेवून वाहन चालकांना सोडून देण्याची बाब पोलीस खात्याला बदनाम करणारी आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याने सातपुते यांनी ही कारवाई केल्याचे समजते.

दंडापेक्षा चिरीमिरी परवडली 

तेजस्ती सातपुते यांनी शाखेचा पदभार स्विकारल्यानंतर कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक असणा-या काही बाबी सुरू केल्या आहेत. तसेच नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील करण्यात येत आहे. मात्र वाहतूक नियमभंग केल्यानंतर दंडाची रक्कम देण्यापेक्षा चिरीमिरी दिलेली परवडली, अशी वाहनचालकांची मानसिकता असते. त्यामुळे दंडापेक्षा तडजोरीवर भर दिला जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस