दहा लाखाला गंडा घालणाऱ्या बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 22:43 IST2020-03-03T22:43:12+5:302020-03-03T22:43:28+5:30
म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने फसवणूक

दहा लाखाला गंडा घालणाऱ्या बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देण्याच्या बहाण्याने एका नागरिकाला दहा लाखाची फसवणूक करणाºया एका बडतर्फ पोलिसासह दोघाजणांना गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. प्रकाश आत्माराम पाडावे ( रा. पालघर) व शशीकांत लिंम्बारे अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून फसवणूकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पाडावे याला २१ वर्षापूर्वी मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. तो म्हाडाचा एका अधिकाºयाकडे बॉडी गार्ड असल्याचे भासवून दलाल लिम्बारे याच्या मदतीने फसवणूक केल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.
पाडावे व लिंम्बारे यांनी एल्फिस्टन रोड प्रभादेवी येथे म्हाडाच्या दुरुस्ती व पुर्नरचना मंडळ (आरआर बोर्ड) येथून स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी खोटी कागदपत्रे बनविले. त्यानंतर फिर्यादीने त्याच्या वडीलांच्या बॅँक खात्यातून आरटीजीएस करुन पाडावेच्या खात्यावर १० लाख रुपय ेभरले. त्यानंतर दोघांनी आरआर बोर्ड व उपजिल्हाधिकाºयाच्या नावे खोटी कागदपत्रे बनवून दिली. फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी गेले असता त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याबाबत गेल्या महिन्यात १२ फेबु्रवारीला भोईवाडा पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा अन्वेषण शाखेचे कक्ष-२चे पथक समांतर तपास करीत होते. प्रभारी अधिकारी निनाद सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघांना मंगळवारी अटक केली.
पाडावेकडून पोलिसांची शस्त्रे विक्री
प्रकाश पाडावे हा १९९६ साली मुंबई पोलीस दलात भरती झाला होता. मात्र झटपट पैसे मिळविण्यासाठी तो गैरमार्ग अवलंबित होता. १९९९मध्ये त्याने नायगाव शस्त्रागारातून पोलिसांचे शस्त्र चोरुन परस्पर विक्री केली होती. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला खात्यातून बडतर्फ करण्यात आले. तेव्हापासून तो पोलीस असल्याचे फसवणूक करतो, त्याच्याविरुद्ध माटुंगा तसेच पुण्यात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.