चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यावर हाणला दगडी चिरा; संशयिताला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 19:30 IST2019-04-01T19:29:21+5:302019-04-01T19:30:56+5:30
भारतीय दंड संहितेच्या 307 कलमाखाली संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यावर हाणला दगडी चिरा; संशयिताला अटक
मडगाव - पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन नवऱ्याने तिच्या डोक्यावर दगडी चिरा हाणण्याची घटना रविवारी रात्री गोव्यातील मडगाव भागातील कोलमरड - नावेली येथे घडली. मूळ झारखंड येथील विलखन डुंगडुंग (25) याला या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपासासाठी त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली. भारतीय दंड संहितेच्या 307 कलमाखाली संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.
मध्यरात्री पावणे एकच्या दरम्यान ही घटना घडली. विलखन हा व्यवसायाने सुतार असून एका बांधकाम प्रकल्पावर तो कामाला होता. पत्नी पूनम (22) हिच्या चारित्र्यावर त्याला संशय होता. त्यातून रात्री दोघांमध्ये खटके उडाले. मागाहून रागाच्या भरात विलखनने पूनमच्या डोक्यावर दगडी चिरा हाणला, यात ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल केले आहे. वसंत कुमार वारकुरी हे तक्रारदार आहेत. पुढील पोलीस तपास चालू आहे.