शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

हत्येचे नाट्यरूपांतर करून सुशील कुमारची चौकशी, छत्रसाल स्टेडियममध्ये ठोस पुरावे शोधण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 08:36 IST

Sushil Kumar News: पोलिसांनी सुशीलला सकाळी घटनास्थळी नेले. दुपारपर्यंत पोलिसांनी घटनेच्या दिवशी नेमके काय घडले असावे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : २३ वर्षांच्या युवा मल्लाच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमार याला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी छत्रसाल स्टेडियम परिसरात नेले. त्याच्या उपस्थितीत हत्येचे नाट्यरूपांतर करण्यात आले. याद्वारे ठोस पुरावे शोधण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुशीलला सहकारी अजयसह रविवारी दिल्लीच्या मुंडका भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सुशीलला सकाळी घटनास्थळी नेले. दुपारपर्यंत पोलिसांनी घटनेच्या दिवशी नेमके काय घडले असावे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याआधी सोमवारी (दि. २४) चार तास सुशीलकडून माहिती घेण्यात आली. घटना घडल्यानंतर सुशील कुठे-कुठे गेला होता, हेदेखील जाणून घेतले. सुशीलला सहकारी मित्रांबाबत विचारपूस करण्यात आली. चार आणि पाच मे रोजीच्या मध्यरात्री सुशील आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या हल्ल्यात सागर नावाच्या मल्लाचा मृत्यू झाला; शिवाय त्याचे काही सहकारी गंभीर जखमी झाले होते. मॉडेल टाऊन येथील फ्लॅटचा ताबा घेण्याच्या वादातून हा प्रकार घडला होता. उत्तर रेल्वेतून  सुशील निलंबितउत्तर रेल्वेने सुशीलच्या निलंबनाचे मंगळवारी आदेश काढले. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक या पदावर कार्यरत सुशील २०१५ पासून दिल्ली सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर होता. छत्रसाल स्टेडियममध्ये तो विशेष कार्य अधिकारी होता. सुशीलला २३ मेपासून निलंबित मानले जाईल, असा आदेश उत्तर रेल्वेने काढल्याची माहिती प्रवक्ते दीपक कुमार यांनी दिली. 

डोक्यावर बोथट  वस्तूने वारजहांगीरपुरी येथील बीजेआरएमएच रुग्णालयाचे डॉ. मुनीष वाधवन यांच्या अहवालानुसार तपासणीसाठी व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने सील करण्यात आले आहेत. डोक्यावर बोथट वस्तूने वार केल्यामुळे सागरचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या मते शरीरावर आढळलेल्या सर्व खुणा मृत्यूच्या अगोदरच्या आहेत.

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारCrime Newsगुन्हेगारी