शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sushil Kumar arrest: लपाछपीचा खेळ संपला! सुशील कुमारला 6 दिवसांची पोलीस कोठडी; कट उघड होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 20:29 IST

Sushil Kumar arrest news: गेल्या काही दिवसांपासून सुशील कुमार फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्ये छापे टाकले होते. शनिवारी सायंकाळी त्याला अटक केल्याचे वृत्त आले होते. हे वृत्त नंतर फेटाळण्यात आले.

Sushil Kumar in Police custody: हत्या प्रकरणात 17 दिवसांपासून फरार असलेल्या ऑलिंपिक पदक विजेता पहेलवान सुशील कुमारला (Sushil Kumar) दिल्ली पोलिसांनी अटक केली. आज त्याला दिल्ली न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनीसुशील कुमारच्या साथीदारालादेखील अटक केली आहे.  (Wrestler Sushil Kumar sent to 6-day police custody in killing of 23-year-old Sagar Rana at Chhatrasal Stadium) 

गेल्या काही दिवसांपासून सुशील कुमार फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्ये छापे टाकले होते. शनिवारी सायंकाळी त्याला अटक केल्याचे वृत्त आले होते. हे वृत्त नंतर फेटाळण्यात आले. मात्र, सकाळी दिल्ली पोलिसांनी पुन्हा अटकेचे वृत्त खरे असल्याचे स्पष्ट केले. राजधानीच्या उत्तरेला असलेल्या छत्रसाल स्टेडियमबाहेर ज्युनिअर सुवर्णपदक विजेता मल्ल सागर राणा याच्या हत्येप्रकरणी आरोपी सुशील कुमार फरार होता. 

 

ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळली होती. पोलिसांचा ससेमिरा चुकवून अज्ञातस्थळी दडून बसलेल्या सुशीलचा शोध घेणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. याशिवाय सुशीलचा खासगी सचिव अजय हा देखील फरार असून, त्याला शोधून देणाऱ्यास ५० हजारांचा रोख पुरस्कार दिला जाणार होता. सुशील कुमारचा खाजगी सचिव अजय कुमारला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

सुशील कुमारला 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्य़ाची मागणी करण्यात आली. मात्र, सुशीलच्या वकिलांनी यास विरोध केला. सुशील कुमारने हत्या केली त्या दिवशी एकूण पाच जणांना उचलून आणण्यात आले होते. त्यांना छत्रसाल स्टेडिअममध्ये आणून जणावरांसारखी मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. या सर्व कटाचा तपास करण्य़ासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच आरोपी सुशील कुमारचे असोदा गँगशी संबंध असल्याचे सांगितेले जात आहे. सोनू नावाचा जखमीदेखील एका गँगचा आहे, यामुळे या कटाचा तपास करण्यासाठी ही कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. 

मात्र, सुशीलच्या वकिलांनी घटनेचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी एक दिवसाचा वेळ पुरेसा असल्याचे न्यायालयाला सांगत यास विरोध केला. अखेर न्यायालयाने सुशील कुमारला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविले. 

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारPoliceपोलिस