शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 2:20 PM

मुंबई पोलीस या प्रकरणात कासव गतीने तपास करत आहेत आणि त्याचवेळी त्याच्या तपासाचा अँगल देखील त्या प्रकरणानुसार योग्य नाही.

ठळक मुद्देमुंबई पोलिसांना मदत करण्याच्या प्रश्नावर विनय तिवारी म्हणाले की, याची कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्यानुसार काम केले जात आहे.अलीकडेच सुशांतचे वडील के के सिंह यांनी एफआयआर दाखल करून रिया आणि त्याच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येला दीड महिना झाला असून अजून पोलीस तपास आणि चौकशी सुरु आहे. दरम्यान, एका वृत्त वाहिनीशी बोलताना राजपूत कुटुंबाचा वकील विकास सिंहने मुंबईपोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केला आहे. विकास म्हणतात की, रविवारी (26 जुलै) एफआयआर दाखल केला असूनही अद्याप रियाविरोधात कारवाई का झाली नाही. तसेच मुंबई पोलीस या प्रकरणात कासव गतीने तपास करत आहेत आणि त्याचवेळी त्याच्या तपासाचा अँगल देखील त्या प्रकरणानुसार योग्य नाही.विकास सिंह यांनी वृत्त वाहिनीशी बोलताना असेही म्हटले आहे की, मुंबई पोलीस सुशांत सिंग राजपूत याच्या कुटूंबावर दबाव आणत आहेत आणि त्यांना मुंबईच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव घेण्यास सांगत आहेत. सोबतच मुंबई पोलीस सुशांतच्या कुटूंबावर बड्या चित्रपट निर्मात्यांचे नाव घेण्यासाठी दबाव आणत आहेत. आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंब अद्याप पोलिसांच्या चौकशीबाहेर आहेत.पुढे विकास म्हणाले की, एफआयआरनंतर ताबडतोब रिया चक्रवर्ती हिला अटक केली जाईल असे आम्हाला वाटले, परंतु तसे झाले नाही. तथापि, आम्हाला अजूनही आशा आहे की, मुंबई पोलिस लवकरच अटक करतील. या संपूर्ण प्रकरणात विनय तिवारी (एसपी सिटी, पाटणा) यांनी बिहार पोलिसांची टीमही मुंबईत दाखल झाली असून तपास करत असल्याचे सांगितले आहे. मुंबई पोलिसांना मदत करण्याच्या प्रश्नावर विनय तिवारी म्हणाले की, याची कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्यानुसार काम केले जात आहे.अलीकडेच सुशांतचे वडील के के सिंह यांनी एफआयआर दाखल करून रिया आणि त्याच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुशांतचे वडील म्हणतात की, रियाने फक्त आपल्या मुलाची मानसिक स्थिती बिघडविली आणि ड्रग ओव्हरडोजही दिला. तसेच के के सिंह पुढे म्हणाले की, सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यात वर्ग करण्यात आले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

 

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

 

धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

 

संतापजनक! रायगड हादरलं, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नराधमाने केली हत्या

 

माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये; तगादा लावल्याने विवाहितेची आत्महत्या

 

फसवणुकीबरोबर आता RTI कार्यकर्ते रवींद्र बर्‍हाटे याच्यावर स्कुटर चोरीचा गुन्हा दाखल

 

मुलानेचं रचला स्वतःच्या अपहरणाचा कट; बापाकडे मागितली ५० लाखांची खंडणी

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याPoliceपोलिसMumbaiमुंबईadvocateवकिल