माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये; तगादा लावल्याने विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 05:25 PM2020-07-27T17:25:03+5:302020-07-27T17:27:09+5:30

याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी सासरच्या सहा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

Bring two lakh rupees from mother's home; Suicide of a married woman due to harassment | माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये; तगादा लावल्याने विवाहितेची आत्महत्या

माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये; तगादा लावल्याने विवाहितेची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देकविता योगेश जंजाळ (२९), असे मयत विवाहितेचे नाव आहे, तर योगेश तेजराव जंजाळ (पती), तेजराव भावराव जंजाळ (सासरा), गंगूबाई तेजराव जंजाळ (सासू), प्रियांका जंजाळ (नणंद), अश्विनी विशाल उबरहंडे, विशाल उबरहंडे (नंदोई, सर्व रा. सिल्लोड), अशी गुन्हा दाखल झालेल्या सास

सिल्लोड : प्लॉट खरेदीसाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने सासरच्या जाचाला कंटाळून एका २९ वर्षीय विवाहितेने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सिल्लोड येथे शनिवारी घडली. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी सासरच्या सहा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.


कविता योगेश जंजाळ (२९), असे मयत विवाहितेचे नाव आहे, तर योगेश तेजराव जंजाळ (पती), तेजराव भावराव जंजाळ (सासरा), गंगूबाई तेजराव जंजाळ (सासू), प्रियांका जंजाळ (नणंद), अश्विनी विशाल उबरहंडे, विशाल उबरहंडे (नंदोई, सर्व रा. सिल्लोड), अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या लोकांची नावे आहेत. मयत महिलेचा भाऊ राजेंद्र पोपटराव पवार (रा. किन्ही, ता. सोयगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील सहा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये कविता आणि योगेश जंजाळ यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर सासरच्या मंडळीने प्लॉट घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. ती मागणी माहेरची मंडळी पूर्ण करू शकली नाही म्हणून सासरची मंडळी त्या विविहितेला नेहमी त्रास देत होती. या सततच्या त्रासाला कंटाळून त्या विवाहितेने कीटकनाशक घेतले. तिला उपचाराकामी औरंगाबाद येथे नेले असता रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. नंतर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.


सहा तासांत सर्व आरोपी जेरबंद
सिल्लोड शहर पोलिसांनी मरणास कारणीभूत असलेल्या सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. मात्र, जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे सिल्लोड शहर पोलिसांनी ६ तासांच्या आता आरोपी पती, सासू, सासरा, नणंद या चार आरोपींना अटक केली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

 

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

 

धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

 

संतापजनक! रायगड हादरलं, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नराधमाने केली हत्या

Web Title: Bring two lakh rupees from mother's home; Suicide of a married woman due to harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.