फसवणुकीबरोबर आता RTI कार्यकर्ते रवींद्र बर्‍हाटे याच्यावर स्कुटर चोरीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 08:15 PM2020-07-27T20:15:48+5:302020-07-27T20:19:59+5:30

फरार होताना घेऊन गेले स्कुटर

RTI Activist Ravindra Barhate has now been charged with scooter theft along with fraud | फसवणुकीबरोबर आता RTI कार्यकर्ते रवींद्र बर्‍हाटे याच्यावर स्कुटर चोरीचा गुन्हा दाखल

फसवणुकीबरोबर आता RTI कार्यकर्ते रवींद्र बर्‍हाटे याच्यावर स्कुटर चोरीचा गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देबर्‍हाटे यांनी पळून जाण्यासाठी मावळ तालुक्यातील देवले येथील एका ओळखीच्या व्यक्तीची फसवणूक करुन स्कुटर चोरुन नेली आहे.याच दरम्यान, पळून जाताना रवींद्र बर्‍हाटे आणि संतोष गिरी यांचा संपर्क झाला होता.

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बर्‍हाटे याच्याविरुद्ध फसवणूक, दमदाटी केल्याप्रकरणी ५ गुन्हे दाखल झाल्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. बर्‍हाटे यांनी पळून जाण्यासाठी मावळ तालुक्यातील देवले येथील एका ओळखीच्या व्यक्तीची फसवणूक करुन स्कुटर चोरुन नेली आहे.


याप्रकरणी संतोष राजाराम गिरी (वय ३९, रा. देवले, ता. मावळ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ११ जुलै रोजी पहाटे साडेचार ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली. बांधकाम व्यावसायिकाला २ कोटी व रास्ता पेठेतील भुखंड देण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी रवींद्र बर्‍हाटे याच्यासह चार जणांवर खंडणीचा गुन्हा ७ जुलै रोजी दाखल केला आहे. याप्रकरणी त्याच रात्री पोलिसांनी पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप व एका महिलेला अटक केली होती. मात्र, याची कुणकुण लागल्याने रवींद्र बर्‍हाटे हे फरार झाले. त्यांना पळून जाण्यास मदत केल्याबद्दल पोलिसांनी तिघांना अटक केली. सत्र न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी रद्द केल्यावर त्यांची जामीनावर सुटका झाली आहे.


याच दरम्यान, पळून जाताना रवींद्र बर्‍हाटे आणि संतोष गिरी यांचा संपर्क झाला होता. संतोष गिरी हे मजुरी काम करतात. ११ जुलै रोजी ते घरी असताना पहाटे साडेचार वाजता बर्‍हाटे यांचा गिरी यांना फोन आला. हायवेवर त्याची गाडी बंद पडली आहे. ती दुरुस्त होईपर्यंत घरी चहा पाण्यासाठी ते गिरी यांच्या घरी आले. काही वेळेने ते निघाले. तेव्हा गाडीपर्यंत जाण्यासाठी त्यांनी गिरी यांची स्कुटर घेतली. ड्रायव्हरजवळ पाठवून देतो, असे सांगून ते स्कुटरवरुन निघून गेले. ती अद्याप आणून दिली नाही. ओळखीचा गैरफायदा घेऊन विश्वासघात केल्याचे गिरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक घोरपडे अधिक तपास करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

 

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

 

धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

 

संतापजनक! रायगड हादरलं, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नराधमाने केली हत्या

 

माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये; तगादा लावल्याने विवाहितेची आत्महत्या

Web Title: RTI Activist Ravindra Barhate has now been charged with scooter theft along with fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.