Sushant Singh Rajput : सुशांतला ड्रग्ज पुरवणारा हरीश खान अडकला NCB च्या जाळ्यात; वांद्र्यात केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 16:10 IST2021-06-02T14:35:02+5:302021-06-02T16:10:20+5:30
Sushant Singh Rajput : हरीश त्याच्या भाऊ शकीब खानसोबत वांद्रे परिसरात ड्रग्सची विक्री करत होता.

Sushant Singh Rajput : सुशांतला ड्रग्ज पुरवणारा हरीश खान अडकला NCB च्या जाळ्यात; वांद्र्यात केली कारवाई
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) जाळ्यात सुशांतपर्यंत ड्रग्ज पोहचवणारा ड्रग पेडलर अडकला आहे. हरीश खान असं त्याचं नाव असून एनसीबीने वांद्र्यातून त्याला अटक केली आहे.शाकीबला एनसीबीने वांद्रे पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
NCB ने २८ मे रोजी सुशांत सिंग राजपूतचा रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पिठानीला हैदराबादमधून अटक केली होती. एनसीबीने नीरज आणि केशव जे सुशांतचे नोकर होते, त्यांची सुद्धा कसून चौकशी केली. या चौकशीनंतर हरीश खान याचं नाव समोर आले. हरीश खान हा ड्रग पेडलर आहे, जो सुशांतपर्यंत ड्रग्ज पोहचवत असे.
हरीश त्याच्या भाऊ शकीब खानसोबत वांद्रे परिसरात ड्रग्सची विक्री करत होता. हरीश खान वांद्रे परिसरातील छोट्या ड्रग पेडलरच अपहरण करायचा आणि त्यांच्याकडे असलेलं ड्रग्स जप्त करुन त्यांना आपल्या टोळीमध्ये काम करण्यास भाग पाडायचा. हरीश खान कधी बंदूक घेऊन फिरायचा तर कधी जिवंत साप घेऊन, अशा प्रकारे लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होता.