Sushant Singh Rajput: सीबीआय पथकाकडून सुशांतच्या फ्लॅटची तपासणी; शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचेही जबाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 02:48 IST2020-08-23T02:47:37+5:302020-08-23T02:48:00+5:30
इमारतीच्या परिसरातही कसून शोध, या पथकाकडून होत असलेल्या सर्व तपासाचे व्हिडिओ शूटिंग घेण्यात आले. त्याच बरोबर फॉरेंसिक एक्स्पर्टकडून फ्लॅटमधील प्रत्येक आवश्यक बाब, वस्तूची तपासणी केली.

Sushant Singh Rajput: सीबीआय पथकाकडून सुशांतच्या फ्लॅटची तपासणी; शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचेही जबाब
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष पथकाने शनिवारी त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटची कसून तपासणी केली. सुमारे सहा तासांहून अधिक काळ चाललेल्या या मोहिमेत अधिकाऱ्यांनी पूर्ण इमारतीचा परिसर, टेरेस धुंडाळून काढीत काही नोंदी घेतल्या. सुशांतसिंहच्या आत्महत्येचा प्रसंग पुन्हा बनवून तपासला. तत्पूर्वी कूपर रुग्णालयात जाऊन १४ जूनला कक्षात ड्युटीवर असलेले आणि शवविच्छेदन करणाºया अशा एकूण पाच जणांचे जबाब नोंदवून घेण्यात आले.
सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी या प्रकरणाची सर्व कागदपत्रे शुक्रवारी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली होती. शनिवारी सकाळपासून त्यांनी तपासाला गती दिली. १५ अधिकाºयांच्या पथकाच्या पाच स्वतंत्र टीम बनविण्यात आल्या. फॉरेंसिक एक्स्पर्टसह त्यांना माहिती व सहकार्य करण्यासाठी मुंबई पोलिसांचे अधिकारीही सोबत होते. एका पथकाने बांद्रा पोलीस ठाण्यात जाऊन तपास अधिकाºयांशी चर्चा केली. त्यांना सोबत घेऊन सुशांतच्या देहाचे विच्छेदन केलेल्या कूपर रुग्णालयात पोहोचले. त्यादिवशी कक्षात ड्युटी असलेले व शवविच्छेदन करणाºयांचे सविस्तर जबाब नोंदविले. त्यावेळी इतक्या तत्परतेने ‘पीएम’ का करण्यात आले, अशी विचारणा केली असता, मुंबई पोलिसांकडून तशा सूचना करण्यात आल्याचे डॉक्टरानी सांगितले.
सर्व तपासाचे चित्रीकरण
या पथकाकडून होत असलेल्या सर्व तपासाचे व्हिडिओ शूटिंग घेण्यात आले. त्याच बरोबर फॉरेंसिक एक्स्पर्टकडून फ्लॅटमधील प्रत्येक आवश्यक बाब, वस्तूची तपासणी केली. त्याचे अहवाल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास सीबीआयचे पथक सुशांतसिंह राजपूत राहत असलेल्या बांद्रा येथील सोसायटीत गेले. त्यावेळी पथकातील अधिकाºयांनी सिद्धार्थ पिठाणी, सुशांतसिंहचा स्वयंपाकी नीरज आणि दीपेश यांनाही सोबत घेतले होते. त्यांचेही जबाब नोंदवण्यात आले.
आत्महत्येचे रिक्रिएशन : काही अधिकाऱ्यांनी सुशांतचा बेडरूममध्ये सिद्धार्थ, नीरज व दीपेश यांनी दिलेल्या माहिती आणि पोलिसांच्या पंचनाम्याचा आधारे ‘सीन आॅफ क्राईम रिक्रिएट’ करण्यात आला. सुमारे सहा तासांहून अधिक काळ फ्लॅटमध्ये थांबून होते. एका टीमने इमारतीत सुशांतच्या शेजारी राहत असलेल्याकडे चौकशी केली. यावेळी पूर्ण परिसर सील करण्यात आला होता.