Sushant Singh Rajput Case : Deepika Padukone will have to face the ACB inquiry tomorrow, questions that may be asked | दीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न  

दीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न  

ठळक मुद्दे दीपिकाला प्रश्न विचारण्यासाठी एनसीबीची प्रश्नांची यादी तयार आहे. प्रश्न त्या ड्रग्ज चॅटपासून सुरू होईल, परंतु ही चौकशी कोठे संपेल हे कोणालाही ठाऊक नाही.

सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या बाबतीत ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी बॉलिवूडची मोठी नायिका पेचात पडली आहे. शुक्रवारी रकुल हिने एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे देताना रियाशी ड्रग चॅट असल्याचे कबूल केले. तर करिश्मा म्हणाली की, दीपिका पादुकोण ड्रग्स चॅट ग्रुपची ऍडमिन होती. आता शनिवारी एनसीबीचे अधिकारी दीपिकाची चौकशी करणार आहेत.

दीपिका पादुकोणचा काउंटडाउन सुरू झाला आहे. बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण शनिवारी सकाळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोसमोर हजर होणार आहे. एनसीबीच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे. दीपिकाला प्रश्न विचारण्यासाठी एनसीबीची प्रश्नांची यादी तयार आहे. प्रश्न त्या ड्रग्ज चॅटपासून सुरू होईल, परंतु ही चौकशी कोठे संपेल हे कोणालाही ठाऊक नाही. एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपिका यांना हे प्रश्न विचारले जाऊ शकतात:-

नैराश्याला बळी पडल्यानंतरच दीपिकाने ड्रग्ज घेणे सुरू केले का ?
दीपिका उदासीनतेच्या वेळी क्वानच्या मॅनेजर करिष्माशी संपर्क साधला होता का?
करिष्मासोबत नैराश्याविषयी बोलताना ती ड्रग्जच्या विश्वात गेली का ?
दीपिकाला बॉलिवूड पार्ट्यांकडून ड्रगची लत लागली का?
दीपिका पादुकोणला ड्रग्स कुठून मिळत ?
तिला प्रत्येक वेळी क्वानच्या मॅनेजरकडून ड्रग्ज मिळत का?
किंवा दीपिकाच्या संपर्कातड्रॅग पेडलर होता का?
बॉलिवूडमध्ये बऱ्याच पार्ट्यांमध्ये ड्रग्ज जास्त घेतली जातात, मग दीपिकाचा दुसरा ड्रग्ज पार्टनर कोण आहे?
दीपिकासमवेत या ड्रग्जच्या जाळ्यात इतर कोणते सेलिब्रिटी आहेत?


काल रात्री गोव्याहून दीपिका मुंबईला परतली. तिचा नवरा रणवीर सिंग तिच्यासोबत होता. दोघांचे चेहरे सांगत होते की, त्यांना खूप त्रास होत  आहे आणि त्यावर मात करणे सोपे नसणार.  दीपिकाची अडचण त्याच दिवशी वाढली ज्यादिवशी तिचे ड्रग्जचे चॅट उघडकीस आले. 28 ऑक्टोबर 2017 रोजी झालेल्या या चॅटमध्ये ती क्वान कंपनीच्या मॅनेजर करिष्माशी बोलत होती. या संभाषणात ड्रग्जचा देखील उल्लेख होता. दीपिका हॅशची मागणी करत होती. मालबद्दल विचारत होती.

 सुशांत प्रकरणात तपासादरम्यान दीपिकाच्या ड्रग्ज कनेक्शनची पोल खोल झाली. रिया आणि क्वान कंपनीची आणखी एक मॅनेजर जया साहा यांच्या चॅटमुळे क्वान कंपनीला घेरले. एनसीबीने रियावर आपली कारवाई केली आणि जया साहाचे नाव उघडकीस आले आणि जयाच्या चौकशीत करिश्माचे नाव समोर आले. करिश्माचा फोन शोधला गेला आणि दीपिकाची तीन वर्षांचे ड्रग चॅट समोर आले. शुक्रवारी म्हणजेच आज एनसीबीने रकुल तसेच करिश्मा यांची चौकशी केली, अशी माहिती आज तकने दिली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

 

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

 

एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

 

बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!

 

धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या 

Web Title: Sushant Singh Rajput Case : Deepika Padukone will have to face the ACB inquiry tomorrow, questions that may be asked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.