Sushant Singh Rajput:...अन् रिया म्हणाली, ‘सॉरी बाबू...’; मृत सुशांतच्या छातीवर हात ठेवून मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 07:08 IST2020-08-24T01:20:15+5:302020-08-24T07:08:28+5:30
रिया सुशांतच्या मित्रासमवेत कूपर रुग्णालयात आली होती, त्यावेळी त्याच्या विनंतीवरून मी तिला शवागृहात घेऊन गेलो,

Sushant Singh Rajput:...अन् रिया म्हणाली, ‘सॉरी बाबू...’; मृत सुशांतच्या छातीवर हात ठेवून मागितली माफी
मुंबई : कूपर रुग्णालयात १४ जूनला शवविच्छेदनानंतर सुशांतसिंहचे शव तेथेच ठेवण्यात आले होते. त्याच्या अंत्यविधीला घरची मंडळी उपस्थित राहू देणार नसल्याने रिया चक्रवर्तीने त्याचदिवशी शवगृहात जाऊन त्याचे दर्शन घेतले होते. त्यावेळी मृतदेहावर हात ठेऊन ‘सॉरी बाबू...’, असे म्हणत ती रडली होती, असा जबाब शवागृहातील कर्मचाऱ्याने सीबीआयला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रिया सुशांतच्या मित्रासमवेत कूपर रुग्णालयात आली होती, त्यावेळी त्याच्या विनंतीवरून मी तिला शवागृहात घेऊन गेलो, मृतदेहाच्या तोंडावरची चादर हटविल्यानंतर रियाला अश्रू रोखता आले नाही, तिने रडतच सुशांतच्या छातीवर हात ठेवून माफी मागितली. पाच मिनिटानंतर मी तिला बाहेर घेऊन आलो, असे त्याने जबाबात म्हटले आहे.