सुशांत राजपूत: "तीन महिन्यांपासून सुरु होते Black Magic"; रियाच्या घरी गोंधळ उडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 01:58 PM2020-08-27T13:58:33+5:302020-08-27T14:01:52+5:30

Sushant singh Rajput case: रिया चक्रवर्तीच्या वडिलांना आज ईडीने नोटिस पाठवून चौकशीला बोलावले होते. सोबत काही कागदपत्रेही मागितली आहेत. आज रियाच्या वडिलांना मीडियाच्या काही तिखट प्रश्नांना सामोरे जावे लागले. यावर ते भडकलेही.

Sushant Rajput: Black Magic starts from three months at Rhea's house; two women's alligation | सुशांत राजपूत: "तीन महिन्यांपासून सुरु होते Black Magic"; रियाच्या घरी गोंधळ उडाला

सुशांत राजपूत: "तीन महिन्यांपासून सुरु होते Black Magic"; रियाच्या घरी गोंधळ उडाला

googlenewsNext

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याने देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या चौकशीने राजकीय, घराणेशाही, आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु झाली आहे. कधी मोठमोठे अभिनेते, कधी दिग्दर्शक, कधी युवा नेता या आरोपांच्या फैरीमध्ये सापडले आहेत. आता तर सुशांतची प्रेयसी रिया आणि तिची फॅमिलीच चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. रियावर आज आणखी गंभीर आरोप झाले आहेत. 


रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakroborthy) वडिलांना आज ईडीने नोटिस पाठवून चौकशीला बोलावले होते. सोबत काही कागदपत्रेही मागितली आहेत. आज रियाच्या वडिलांना मीडियाच्या काही तिखट प्रश्नांना सामोरे जावे लागले. यावर ते भडकलेही. मात्र, रियाच्या सोसायटीत आज मोठा हंगामा झाला आहे. दोन महिलांनी तिच्या सोसायटीत घुसून रियाच्या कुटुंबीयांवर काळी जादू (Black Magic) केल्याचा आरोप केला आहे. 

Video: जग पुन्हा हादरले! रशियाने सर्वात शक्तीशाली, संहारक अणुबॉम्ब जगासमोर आणला


या दोन्ही महिला खारच्या राहणाऱ्या होत्या. त्यांच्या बोलण्यावरून त्या सुशांच्या चाहत्या वाटत होत्या. या महिलांनी रियाच्या सोसायटीत प्रवेश केला आणि रियाच्या आईवर काळी जादू केल्याचा आरोप केला. दोन्ही महिला रियाच्या कुटुंबावर नाराज असून त्यांनाच दोषी मानत आहेत. यावेळी त्यांनी रियाच्या कुटुंबावर हल्ला केला. यामुळे तिथे मोठा गोंधळ उडाला. यानंतर सुरक्षा रक्षकांनी या महिलांना बाहेर काढले. 


या महिलांनी आरोप केला की, रियाची आई पांढऱ्या पावडरचा वापर करत होती. सुशांतवर तीन महिने ब्लॅक मॅजिक करण्यात आले. त्यांना या काळ्या जादूची माहिती रियाची मोलकरीन आणि शेजाऱ्यांकडून समजली होती. या लोकांना माहिती होते की, रियाचे कुटुंबीय सुशांतला मारणार आहेत. पोलिसांवर विश्वास नव्हता त्यामुळे आम्ही पोलिसांकडे गेलो नाही, असे सांगितले. या महिलांचा गोंधळपाहून रियाचे वडील त्रस्त झाले आणि घरात गेले. 

रेल्वेमध्ये भरती, मुलाखत...; 50 जणांकडून उकळले 1 कोटी


रियानं तिच्या राहत्या घरातून व्हिडीओ चित्रित केला आहे. त्यात रियाचे वडील इंद्रजीत इमारतीच्या आवारात दिसत आहेत. त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला आहे. 'हा व्हिडीओ माझ्या इमारतीच्या कंपाऊंडमधील आहे. त्या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती माझे वडील इंद्रजीत चक्रवर्ती (निवृत्त लष्करी अधिकारी) आहेत. आम्ही घराबाहेर पडून ईडी, सीबीआय आणि विविध तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय. पण माझ्या आणि कुटुंबाच्या जीविताला धोका आहे,' असं रियानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओसोबत म्हटलं आहे.


जिम पार्टनरचा डॅडीवर संशय
काही दिवसांपूर्वी सुशांतच्या जिम पार्टनरने मोठा खळबळजनक दावा केला आहे. सुशांतच्या हत्येच्या कटामागे दोन डॅडींचा हात असल्याचा आरोप त्याने केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुशांत राजपूतचा मित्र आणि जिम पार्टनर सुनील शुक्ला याने हा नवा दावा केला आहे. हे दोन डॅडी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून रिया चक्रवर्तीचे (Rhea Chakroborthy) वडील इंद्रजीत आणि निर्माते महेश भट(Mahesh bhat) असल्याचे शुक्ला याने म्हटले आहे. 
सुनीलने सांगितले की, मि. चक्रवर्ती त्यांची मुलगी रियाच्या माध्यमातून सुशांतला औषधे देत होते. 8 जूनला जेव्हा रियाने सुशांतचे घर सोडले त्यानंतर कोणीतरी सुशांतला ही औषधे देत होता. तो संजय, नीरज किंवा सिद्धार्थ असू शकतो. या तिघांपैकी कोणीतरी नक्कीच सुशांतला औषध देत होता. माझा मित्र कधी डिप्रेशनमध्ये नव्हता. ही औषधे तो विश्वासाच्या आधारावर घेत राहिला. 


चावीवाल्याचा खुलासा...
चावीवाल्याला  १४ जून रोजी जेव्हा दरवाज्याचा लॉक उघडण्यासाठी बोलवण्यात आलं तेव्हा त्याला हे माहीत नव्हतं की, हे सुशांत सिंह राजपूतचं घर आहे. त्याने सांगितले की, सिद्धार्थ पिठानीने त्याला फोन केला होता. दरवाज्याचं लॉक उघडताच त्याला लगेच २ हजार रूपये दिले गेले आणि त्याला लगेच जाण्यासाठी सांगण्यात आले. लॉक कॉम्प्युटराइज्ड होतं. ते त्याला हातोड्याने तोडावं लागलं. लॉक तोडल्यावर त्याला २ हजार रूपये देऊन लगेच जाण्यास सांगण्यात आलं. त्याला रूममध्ये जाण्यास मनाई केली होती. त्याला तेथून दूर करण्यात आलं होतं.

राऊत काय म्हणालेले?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले आहेत. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे हे भाजपाचे नेते आहेत आणि 2009मध्ये त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे' असं म्हणत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला आहे.

१७ कोटींपैकी १५ कोटींचे व्यवहार संशयास्पद
सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी त्याच्या खात्यात १७ कोटी होते. त्यापैकी १५ कोटी त्याचा संबंध नसलेल्या खात्यात वळते झाले. यात सुशांतचे क्रेडिट, डेबिट कार्ड रियाकडेच होते. त्यामुळे तिने आणि तिच्या कुटुंबाने पैसे खर्च केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

अन्य महत्वाच्या बातम्या...

लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कबुली

बडे काम की चीज! LIC ने आणली नवी पॉलिसी; आयुष्यभर देणार उत्पन्न

शेवटी आयआयटीच ती! कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी; एका चार्जिंगमध्ये 1600 किमीची रेंज

CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य

एकटीला पाहून साधुने बलात्काराचा प्रयत्न केला; मार्शल आर्ट मास्टर महिलेने धु धु धुतले

Web Title: Sushant Rajput: Black Magic starts from three months at Rhea's house; two women's alligation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.