हनीट्रॅप आणि ब्लॅकमेलिंग... आत्महत्येपूर्वी रेस्टॉरंट मालकाने व्हिडिओद्वारे सांगितली आपबीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:28 IST2025-02-09T13:16:41+5:302025-02-09T13:28:27+5:30

आत्महत्येपूर्वी रेस्टॉरंट मालकाने एक व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये त्याने आत्महत्या करण्याचे कारण सांगितले असून यासाठी चार लोकांना जबाबदार धरले आहे.

surat cunning woman honeytrap and blackmailing she trapped restaurant owner tragic end  | हनीट्रॅप आणि ब्लॅकमेलिंग... आत्महत्येपूर्वी रेस्टॉरंट मालकाने व्हिडिओद्वारे सांगितली आपबीती!

हनीट्रॅप आणि ब्लॅकमेलिंग... आत्महत्येपूर्वी रेस्टॉरंट मालकाने व्हिडिओद्वारे सांगितली आपबीती!

सुरत : सुरतमधील वराछा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका रेस्टॉरंट मालकाने हनीट्रॅपला बळी पडून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येपूर्वी रेस्टॉरंट मालकाने एक व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये त्याने आत्महत्या करण्याचे कारण सांगितले असून यासाठी चार लोकांना जबाबदार धरले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश भाई असे आत्महत्या केलेल्या रेस्टॉरंट मालकाचे नाव आहे. ते गिरिराज नावाच्या एका रेस्टॉरंटचे मालक होते. योगेश यांच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या महिलेने त्यांना आपल्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप आहे. तसेच, योगेश यांच्यावर आधीच कर्ज होते. यादरम्यान, ते हनीट्रॅपमध्ये अडकले. 

आत्महत्या करण्यापूर्वी योगेश यांनी गुजराती भाषेत व्हिडिओत बनवला आहे. यात त्यांनी रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने आणि तिच्या वहिनीने आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचे म्हटले आहे. तसेच, या प्रकरात रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या महिलेची वहिनीच मास्टमांइड आहे. ती मला तिच्यासोबत घेऊन गेली होती. त्यानंतर चार-पाच दिवसांनी परत आल्यानंतर तिने ५ लाख रुपये मागितले, असा आरोप योगेश यांनी व्हिडिओत केला आहे.

याचबरोबर, पैसे दिले नाहीत मारून टाकेन आणि दुकानाची तोडफोड करेन, अशी धमकी तिने दिली होती. मला तिने पैसे देण्यास भाग पाडले गेले. माझ्याकडून पैसे घेतले. माझा मुलगा आणि पत्नी अनाथ झाले आहेत. माझ्या आत्महत्येला चार लोक जबाबदार आहेत. या चौघांना शिक्षा झाली पाहिजे. मला पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा आहे. या लोकांनी माझे आयुष्य उध्वस्त केले आहे. माझ्यावर एक कर्ज होते, जे मी फेडत होतो, असेही योगेश यांनी व्हिडिओत म्हटले आहे.

हा व्हिडिओ बनवल्यानंतर रेस्टॉरंट मालक योगेश भाई यांनी सुरतमधील कामरेज परिसरातील तापी नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, या प्रकरणी योगेश यांच्या पत्नीने व्हिडिओमध्ये उल्लेख केलेल्या दोन महिला आणि दोन पुरुषांविरुद्ध वरछा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एसीपी पीके पटेल म्हणाले की, मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Web Title: surat cunning woman honeytrap and blackmailing she trapped restaurant owner tragic end 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.