शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जावयाचा ‘ दैत्य पराक्रम ’ : सासू-सासऱ्यांना कारने उडवून दांडक्याने मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 21:07 IST

आपल्या मुलीचा सासरी वारंवार छळ करत मारहाण करणाऱ्या जावयाविरोधात पोलिसांत तक्रार देण्यासाठी सासू-सासरे निघाले होते.

ठळक मुद्देउरुळी कांचन येथील घटना, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

उरुळी कांचन : आपल्या मुलीचा सासरी वारंवार छळ करीत मारहाण करणाऱ्या जावयाविरोधात पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघालेल्या सासू-सासऱ्यांच्या दुचाकीला आपल्या चारचाकी वाहनाने धडक देत नंतर सासू-सासऱ्यांना लाकडी दांडक्याने जावयाने बेदम मारहाण केल्याची घटना उरुळी कांचन गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. २९) घडली. मारहाण करताना शेजारील नागरिक संतप्त होऊन अंगावर धावल्याने आपली सुटका करून घेण्याचा नादात या जावयाने पुन्हा एका दुचाकीस्वाराला आपल्या चार चाकीने उडवून गंभीर जखमी केले आहे.  या प्रकरणी शिवाजी आनंता म्हस्के (वय ५५, रा. डाळिंब , ता. दौंड) यांंनी आपल्या जावयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या हल्लात सविता शिवाजी म्हस्के (वय ५०, रा. डाळिंब, ता. दौंड) या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर, कारने धडक देऊन सोमनाथ दादा तुपसौंदर (वय ४०, रा. खुडावस्ती, डाळिंब, ता. दौंड) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी आमोल परशुराम महाडिक (वय ३६, रा. काळेशिवारवस्ती, शिंदवणे, ता. हवेली) या जावयाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिवाजी म्हस्के यांची मुलगी उज्ज्वला यांचा विवाह अमोल महाडिक यांच्याशी झाला आहे. अमोल हा आपल्या पत्नीला  वारंवार मारहाण करीत तिचा छळ करीत होता. यामुळे  शुक्रवारी (दि. २९) सासरे शिवाजी म्हस्के व सासू सविता हे उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्रात तक्रार देण्यासाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून उरुळी कांचनच्या दिशेला निघाले. सासू-सासरे तक्रार करणार असल्याची कुणकुण लागताच जावई अमोल महाडिक हा त्याच्या मोटारकारने उरुळी कांचन-डाळिंब रस्तावर येऊन सासू-सासºयांचा दुचाकीला कारने जोरदार धडक देऊन दोघांना रस्त्यावर पाडले. त्यानंतर गाडीतून काढलेल्या लाकडी दांडक्याने सासू-सारसºयांना मारहाण केली. रस्त्यावर हा मारहाणीचा प्रकार झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपी अमोल महाडिक याचा अंगावर धाव घेतल्याने कार चालू करून पळण्याचा प्रयत्नात रस्त्यावर समोरून येणारे सोमनाथ दादा तुपसौंंदर यांना १०० फूट अंतरावर कारने उडवून महाडिक पळाला. या धडकेत तुपसौंंदर हे जखमी झाले आहेत. नागरिकांनी तत्काळ जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आरोपी अमोल महाडिक हा मारहाण करून फरार झाला असून पोलिसांनी आरोपीवर मारहाणीस  व अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी