भोसरीत दोन विवाहित महिलांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 10:47 PM2020-06-13T22:47:41+5:302020-06-13T22:48:29+5:30

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांनी संपवले जीवन..

Suicide by two married women in bhosari | भोसरीत दोन विवाहित महिलांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

भोसरीत दोन विवाहित महिलांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

पिंपरी : राहत्या घरात गळफास घेऊन दोन विवाहितांनी आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. पहिली घटना शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी तर दुसरी घटना शनिवारी (दि. १३) सकाळी भोसरी येथे उघडकीस आली.
सुप्रिया ज्ञानेश्वर मुंडे (वय २३, रा. विठ्ठलपार्क, गव्हाणे पेट्रोल पंपाच्या मागे, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात त्यांचा विवाह झाला होता. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 
आत्महत्येची दुसरी घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. प्रज्ञा मनोज भोरे (वय ३४, रा. विकासनगर, कॉलनी, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्ञा आणि त्यांच्या पतीचे शुक्रवारी रात्री भांडण झाले होते. त्यानंतर पती घराबाहेर निघून गेला. प्रज्ञा यांनी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. छळ होत असल्याचा प्रज्ञा यांच्या माहेरच्यांनी आरोप केला असून, त्यानुसार पोलिसांनी प्रज्ञा यांच्या पतीला ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Suicide by two married women in bhosari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.