धक्कादायक! शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 09:42 PM2020-02-05T21:42:01+5:302020-02-05T21:45:38+5:30

लातुरातील घटना : राहत्या घरातच संपविले जीवन

Suicide of a teacher by hanging in Latur | धक्कादायक! शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

Next
ठळक मुद्देलातुरातील विकास नगरात गेल्या काही वर्षापासून रामदास भगवान केंद्रे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिक्षक रामदास केंद्रे यांनी आत्महत्या का केली? याबाबतचे कारण मात्र, रात्री उशिरापर्यंत समोर आले नाही.

लातूर -  राहात्या घरी एका शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी लातुरातील विकास नगरात घडली. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामदास भगवान केंद्रे असे मयत शिक्षकाचे नाव आहे. 

पोलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील रुद्घा येथील मूळचे रहिवासी असलेले रामदास भगवान केंद्रे (३२) हे लातुरातील विकास नगरातील एका शाळेवर शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून ते आपल्या नोकरीनिमित्त विकासनगरात वास्तव्याला होते. दरम्यान, त्यांनी आपल्या राहत्या घरात छताच्या फॅनला साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांनी भेट देवून पाहणी केली. याबाबत मयत शिक्षकाचा चुलतभाऊ नागनाथ नारायण केंद्रे (५० रा. रुद्घ ता. अहमदपूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीच्या आधारे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्षक रामदास केंद्रे यांनी आत्महत्या का केली? याबाबतचे कारण मात्र, रात्री उशिरापर्यंत समोर आले नाही.

तपासानंतर कारण स्पष्ट होईल...
लातुरातील विकास नगरात गेल्या काही वर्षापासून रामदास भगवान केंद्रे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक स्पष्ट होईल, असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के. बी. नेहरकर म्हणाले.

Web Title: Suicide of a teacher by hanging in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.