एकतर्फी प्रेमातून मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 21:13 IST2018-12-05T21:11:50+5:302018-12-05T21:13:27+5:30
चिंचेच्या झाडाला दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एकतर्फी प्रेमातून मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
ठाणे - एकतर्फी प्रेमातून ठाण्याच्या वाघबीळ भागात राहणाऱ्या सरोज पाटणदिन (वय 22) या तरुणाने चिंचेच्या झाडाला दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सरोज हा बिगारी कामगार असून वाघबीळ, आनंदनगर जंक्शनजवळील एका भिंतीवर आत्महत्येपूर्वी त्याने ‘स्वत:चे आणि एका मुलीचे नाव टाकून ‘मै तनहा हूं, असे लिहिले आहे. कासारवडवली पोलिसांनी शवविच्छेदनानंतर वाघबीळ येथील त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात त्याचा मृतदेह दिला. एकतर्फी प्रेमातून नैराश्येपोटी त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.