कर्जबाजारीपणामुळे गरोदर पत्नीसह पतीची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 16:15 IST2018-09-26T16:12:22+5:302018-09-26T16:15:47+5:30
कांचना ही 9 महिन्यांची गर्भवती होती. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कर्जबाजारीपणामुळे गरोदर पत्नीसह पतीची गळफास घेऊन आत्महत्या
विरार - विरार परिसरात एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. रोहन आणि कांचना सिंग अशी या दाम्पत्याची नावे आहेत. कांचना ही 9 महिन्यांची गर्भवती होती. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
विरार पूर्वेच्या कोपरी येथील विघ्नहर्ता पार्क इमारतीत रोहन सिंग (वय 28) आणि कांचना सिंग (वय 24) हे दांपत्य राहत होते. मयत कांचना ही इमारतीचे पाणी सोडण्याचे काम करत होती. तर पती रोहन बेरोजगार होता. काल सकाळी इमारतीचे पाणी आले नव्हते. पाणी का सोडले नाही हे विचारण्यासाठी इमारतीचे रहिवासी त्यांच्या घरी गेले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे रहिवाशांना संशय आला. त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता रोहन व कांचना यांनी वेगवेगळ्या ओढणीच्या सहाय्याने गळफास लावल्याचे आढळून आले.