शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

कर्करोगग्रस्त मातेची गतिमंद मुलीसह आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 6:53 PM

विष प्राशून विहिरीत घेतली उडी, मेळघाटच्या नागापूर येथील घटना 

चिखलदरा (अमरावती) - आपल्या असह्य आजाराने मृत्यू झाल्यावर गतिमंद असलेल्या मुलीचे काय होणार, या विवंचनेत सापडलेल्या एका मातेने स्वत: आणि १५ वर्षीय गतिमंद व अंध मुलीला विष पाजले. यानंतर तिला घेऊन विहिरीत उडी घेतली. दुहेरी आत्महत्येची ही घटना रविवारी चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथे दुपारी २ च्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कमला नारायण जामकर (वय ४०) व ज्योती नारायण जामकर (वय १५) असे आत्महत्या केलेल्या आई व मुलीचे नाव आहे. कमला जामकर या रक्ताच्या कर्करोगाने गेल्या काही दिवसांपासून ग्रस्त होत्या. त्यांना एक मुलगा असून, तो इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. लग्न झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी पतीसोबत खटके उडाल्याने त्या माहेरी दोन मुलांसह राहत होत्या. रविवारी दुपारी ११ वाजता दोघीही माय-लेकी घरून निघाल्या. त्यांनी प्रथम विष प्राशन केले व नंतर धरणाच्या बुडीत क्षेत्रात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. घटनेची माहिती नागापूरच्या पोलीस पाटील अनिता संजीव धिकार यांनी चिखलदरा पोलिसांत केली. पोलिसांनी गावकºयांच्या मदतीने रविवारी रात्री दोघींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी शवविच्छेदन केल्यानंतर परिजनांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. घटनेचा तपास ठाणेदार आकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अंकुश राठोड, एएसआय सुरेश लाखोडे, निलेश काशीकर व सहकारी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या