शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह मॅरेजने निराश तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, ३ महिन्यात संसार मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 09:38 IST

अवघ्या तीन महिन्यांत मोडला संसार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहानंतर पती, सासूकडून होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने उलवे परिसरातील मोरावे या गावात आपल्या सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. या संबंधात तिच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून पती वैभव, सासू संगीता व दीर अमोल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलोनी वैभव म्हात्रे (१९) असे या नवविवाहितेचे नाव असून मे महिन्यात तिचा वैभव म्हात्रे (२०) सोबत प्रेमविवाह झाला होता. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचा विवाह लावून देण्यात आला होता. वैभव हा नोकरी, व्यवसाय करत नसल्याने तो पत्नी सलोनी हिला माहेरहून पैसे मागण्यास सांगत होता. शिवाय सासू व दीरदेखील वेगवेगळ्या कारणांनी तिचा छळ करीत होते. त्यामुळे सलोनीचे आई-वडील तिच्या सुखासाठी तिला पैसेदेखील पुरवत होते. 

शनिवारी तिची आई तिच्यासाठी गोड जेवणदेखील घेऊन गेली होती, तर रविवारी दुपारी तिचा भाऊ पैसे देण्यासाठी बहिणीच्या सासरी गेला होता. यावेळी घरात कोणीही आढळून आले नव्हते. काही वेळाने सलोनीला रुग्णालयात दाखल केले असल्याचे त्यांना समजले. यामुळे त्यांनी रुग्णालयात धाव घेतली असता सलोनीचा मृत्यू झाला असून तिने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. 

पती, सासू व दीरावर गुन्हाप्रेमविवाह करूनदेखील पतीकडून झालेली निराशा व सासरी होणारा छळ याला कंटाळून तिने आत्महत्या  केल्याचा आरोप तिचे वडील देवीदास मुंढेकर यांनी केला आहे. त्यानुसार, एनआरआय पोलिस ठाण्यात पती वैभव, सासू संगीता व दीर अमोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस