आत्महत्येचं फेसबुक लाईव्ह! कुटुंबीयांच्या नकारानंतर प्रेमीयुगुलाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 06:38 PM2020-03-19T18:38:30+5:302020-03-19T18:39:42+5:30

या आत्महत्येच्या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.

Suicide Facebook Live! After the disapproval of the family, the couple ended their life pda | आत्महत्येचं फेसबुक लाईव्ह! कुटुंबीयांच्या नकारानंतर प्रेमीयुगुलाने संपवले जीवन

आत्महत्येचं फेसबुक लाईव्ह! कुटुंबीयांच्या नकारानंतर प्रेमीयुगुलाने संपवले जीवन

Next
ठळक मुद्देदेवरी गावात राहणारे अरुण पाल (२०) आणि ख़ुशी (१९) हे एकमेकांवर प्रेम करत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून अरूण आणि खुशीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 

पन्ना - मध्य प्रदेशातील पन्ना भागात प्रेमविवाहास नकार मिळाल्यानंतर प्रेमीयुगुलाने एकत्र झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. इतकेच नव्हे तर आत्महत्येचा धक्कादायक घटनेचे त्यांनी फेसबुकवर लाईव्ह करत व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे या आत्महत्येच्या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. 

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघांनीही आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर लाईव्ह केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पन्नाच्या शाहनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरिया गावात हे घडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांना या प्रकरणी पाचारण करण्यात आलं. देवरी गावात राहणारे अरुण पाल (२०) आणि ख़ुशी (१९) हे एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र, दोघेही वेगवगेळ्या समाजातील असल्याने कुटुंबास त्यांचे प्रेमसंबंध मेनी नव्हते. ह्यावर्षी २५ फेब्रुवारीला कुटुंबीयांनी खुशीचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावून दिलं होत. होळी सणासाठी ख़ुशी माहेरी आली होती. त्यावेळी तिची अरुणसोबत भेट झाली आणि त्या दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 

दोघेही गावात झाडीमध्ये गेले. वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर खुशीची ओढणी झाडाला बांधली. यानंतर ओढणी एकमेकांच्या गळ्याला बांधून मिठीत घेतच दोघांनी आपला अंत केला. पोलिसांनी घटनास्थळावरून अरूण आणि खुशीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 

Web Title: Suicide Facebook Live! After the disapproval of the family, the couple ended their life pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.