फॅक्टरीमधील कँटीनमध्ये कामगाराची गळफास लावून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 19:21 IST2019-03-18T19:18:13+5:302019-03-18T19:21:33+5:30
संजीव कमलसिंग बेहनवाल (२६) हा त्याच्या नातेवाईकांसह उल्हासनगर - ३ येथील फालवर लाईन परिसरात राहात होता.

फॅक्टरीमधील कँटीनमध्ये कामगाराची गळफास लावून आत्महत्या
ठाणे - अंबरनाथ येथे काल रात्री ऑर्डनन्स फॅक्टरीमधील कँटीनमध्ये कामाला असलेल्या संजीव बेहनवाल या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून संजीव कमलसिंग बेहनवाल (२६) हा त्याच्या नातेवाईकांसह उल्हासनगर - ३ येथील फालवर लाईन परिसरात राहात होता.
संजीवचे वडील कमलसिंग बेहनवाल हे ऑर्डनन्स फॅक्टरी येथे कामाला होते. ७ वर्षांपूर्वी कमलसिंग यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी संजीव कामाला लागला होता. त्याची नियुक्ती कँटीनमध्ये झाली होती. काल रात्री तो रात्रपाळीला आला होता. मध्यरात्री २. ३० वाजताच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे इतर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अपमृत्यूची मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आज ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आयोजित करण्यात आलेला शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.