शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
2
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
3
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
4
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
5
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
6
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
7
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
8
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
9
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
10
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
11
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
12
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
13
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
14
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
15
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
16
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
17
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
18
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
19
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
20
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! फोनवर तरुणांशी बोलल्याची इतकी जीवघेणी शिक्षा; कुटुंबीयांनी केलेली बेदम मारहाण व्हिडिओत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 20:55 IST

Crime News : एवढेच नाही तर तेथील लोकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला पण कोणीही त्यांना वाचविण्याची तसदी घेतली नाही.

ठळक मुद्देव्हिडिओमध्ये केवळ तरुणांनीच नव्हे तर महिलांनीही लाठीने मारहाण केली. मुलींना दगड आणि लाथा - बुक्यांनी देखील मारहाण केली. व्हिडिओ काही दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे.

मध्य प्रदेशच्या अलिराजपूरमध्ये धरणी जिल्ह्यातील  टांडा  पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या  पीपलवा  गावचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे मुलींशी झालेल्या गैरवर्तन आणि मारहाणीचा विषय मिटलेला नाही. व्हिडिओमध्ये दोन मुलींना बेदम मारहाण करण्यात आली होती. व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की काही लोक दोन अल्पवयीन मुलींना लाठीकाठीने जबर मारहाण करीत आहेत. मुलींना मारहाण करणारे जनावरांपेक्षा वाईट वागताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करणारे लोक हे संबंधातील मुलींचे चुलत चुलत भाऊ आहेत. घरातील सदस्यांनी मुलींसोबत मारहाणीचे गैर कृत्य केले आहे. एवढेच नाही तर तेथील लोकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला पण कोणीही त्यांना वाचविण्याची तसदी घेतली नाही.व्हिडिओ पाहून, हे स्पष्ट आहे की, कोणाच्याही मनात कायद्याची भीती नाही. प्रत्येकजण कायदा हातात घेण्याकडे झुकला आहे. व्हिडिओमध्ये, मुली ओरडत राहिल्या परंतु मारहाण करणाऱ्या लोकांच्या मानला कायद्याची भीती नाही. मुली त्यांच्याकडे दया - याचना करत राहिल्या, पण त्यांना सतत काठीने मारहाण करण्यात आली. व्हिडिओमध्ये केवळ तरुणांनीच नव्हे तर महिलांनीही लाठीने मारहाण केली. मुलींना दगड आणि लाथा - बुक्यांनी देखील मारहाण केली. व्हिडिओ काही दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे.मानहानीला बळी ठरलेल्या, दोन्ही मुली चुलत असून दोघांचेही लग्न अलीराजपूरच्या जोबटमध्ये झाले आहे. मुलींनी असा आरोप केला आहे की, उपस्थित लोकांनी त्यांना शाळेजवळ थांबवले आणि मामाच्या कुटूंबाच्या दोन मुलांबरोबर फोनवर का बोलतात हे त्यांना विचारले. यानंतर, फक्त फोनवर बोलल्याबद्दल मुलींना बेदम मारहाण केली. दोन्ही मुली इतक्या भयभीत झाल्या की त्यांनी तक्रार नोंदविली नाही.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात दखल घेतली असल्याचे  टांडा चे पोलिस स्टेशन प्रभारी विजय वासकळे यांनी सांगितले. घटनास्थळी भेट दिल्यानंतर मुलींना पोलिस ठाण्यात आणले. येथे चौकशी केली असता मुलींनी सांगितले की, त्यांच्या नातेवाईकांनीच त्यांना मारहाण केली. तक्रारीवरून पोलिसांनी कुटुंबातील ७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आणि सर्वांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश