शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बसखाली चिरडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 15:41 IST

या अपघातमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं- ५ परिसरात राहणारा छोटू प्यारेलाल प्रजापती-१५ हा कॅम्प नं-३ येथील भारती हिंदी हायस्कुलमध्ये दहावी इयत्तेत शिकत होता. मृत छोटू प्रजापती याला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करून आई-वडील व शाळेला माहिती दिली.

उल्हासनगर - भारती हिंदी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणारा छोटू प्रजापती व्हीनस चौकात आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी एसटी बसखाली आला आणि त्याचा चिरडून जागीत मृत्यू झाला. या अपघातमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं- ५ परिसरात राहणारा छोटू प्यारेलाल प्रजापती-१५ हा कॅम्प नं-३ येथील भारती हिंदी हायस्कुलमध्ये दहावी इयत्तेत शिकत होता. सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान सायकल वरून शाळेला जात असताना व्हीनस चौकात विठ्ठलवाडी आगार परिवहन बसच्या खाली सापडून जागीच ठार झाला. अपघाताची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, पंचनामा केला. तसेच मृत छोटू प्रजापती याला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करून आई-वडील व शाळेला माहिती दिली.

एसटी परिवहन बस चालकाने विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून स्वतः पोलिसांच्या ताब्यात दिले. तर पोलिसांनी बस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्या समोर उभी केली आहे. सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून शहरातील वाहतूक समस्या बघता मुलांकडे सायकली देऊ नका, असे आवाहन समाजसेवी संघटनेने केले आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसStudentविद्यार्थीBus Driverबसचालक