विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकास अटक; चंद्रपूर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 21:04 IST2022-07-21T21:03:34+5:302022-07-21T21:04:16+5:30
Crime News : पीडित विद्यार्थिनी शहरातील एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेत आहे. मागील एक महिन्यापासून शिक्षक तिचा विनयभंग करत होता.

विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकास अटक; चंद्रपूर येथील घटना
चंद्रपूर : दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास रामनगर पोलिसांनी कलम 354 पोस्को, ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अभिजीत मधुकर रागिट (36) असे अटकेतील शिक्षकाचे नाव आहे.
पीडित विद्यार्थिनी शहरातील एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेत आहे. मागील एक महिन्यापासून शिक्षक तिचा विनयभंग करत होता. शेवटी सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने रामनगर पोलीस स्टेशन गाठून बुधवारी शिक्षकाविरुद्ध तक्रार केली.
त्यानुसार रामनगर पोलिसांनी कलम 354 पोस्को ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अभिजीत रागीट यास अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास चंद्रपूरचे एसडीपीओ सुधीर नंदनवार आहेत.