मुख्याध्यापकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 00:55 IST2021-03-13T00:55:25+5:302021-03-13T00:55:38+5:30
महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्याध्यापकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : रायगड जिल्हा परिषदेच्या महाड तालुक्यातील किंजळोली शाळेमध्ये शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीचा मुख्याध्यापकाने विनयभंग केल्याची तक्रार या मुलीच्या आईने महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ मार्च रोजी दुपारी बारा वाजता महाड तालुक्यामध्ये किंजळोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आठवीच्या वर्गामध्ये शिकणारी ही मुलगी शाळेमध्ये एकटी असताना मुख्याध्यापक पंडित महाडिक यांनी या मुलीचा विनयभंग केला.