शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरी करणाऱ्यांवर महावितरणची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 23:18 IST

वीज चोरी करणाऱ्या 10 जणांवर 3 गुन्हे दाखल

नालासोपारा - वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत ज्या प्रकारे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत त्याचप्रमाणे वीज चोरी करणाऱ्यांची संख्याही तेजीने वाढत आहे. वीज चोरी करणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी महावितरणने जोरदार कारवाई सुरू केली असून त्यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे सुरू आहे. नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील संतोष भवन परिसरात वीज चोरी करणाऱ्या 10 जणांविरोधात महावितरणने तक्रारी दिल्यानंतर तुळींज पोलिसांनी मंगळवारी तीन गुन्हे दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूर्वेकडील संतोष भवन येथील विजय सिंह चाळीतील सदनिका नंबर 2, 3, 5, 6, 7 आणि 16 यामध्ये मागील सहा महिन्यांपासून चोरीची वीज वापरली जात होती. महावितरणने तक्रार दिल्यानंतर बांधकाम व्यवसायिक संजय सिंह याच्यासोबत सदनिकेमध्ये राहणारे सोनिया विश्वकर्मा, राजू माईवलाल वर्मा, राम विलास विश्वकर्मा, अया अब्दुल खान, मोहम्मद शकिर खान, मोहम्मद शकरीर खान आणि राजू चंद्रकांत उदिर यांनी गेल्या 6 महिन्यापासून 31 हजार 80 रुपयांची 2021 युनिटची वीज चोरी केली म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या घटनेत संतोष भवन परिसरातील गरेल पाडा येथील दुर्गावती चाळीतील दुकान नंबर 1 आणि 2 मध्ये आम्रपाली लल्लनप्रसाद राजभर यांनी 9 हजार 220 रुपयांची 605 युनिटची वीज चोरी केली आहे. तर याच परिसरातील चाळीमध्ये असलेल्या सदनिका नंबर 4, 5 आणि 6 मध्ये संदीप प्यारेलाल राजभर यांनी मागील 6 महिन्यापासून 19 हजार 890 रुपयांची 1080 युनिटची वीज चोरी केली आहे. या तिन्ही तक्रारी महावितरणचे ज्युनियर इंजिनिअर झिशान अहमद जमाल यांनी तुळींज पोलीस ठाण्यात केलेल्या आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmahavitaranमहावितरणelectricityवीजRobberyदरोडाPoliceपोलिस