शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

भटक्या कुत्र्यांमुळे झाला हत्येचा उलगडा; चार तासात पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 12:47 AM

मित्रानेच दारूच्या नशेत मुकेशची हत्या करून त्याचा मृतदेह वालधुनी परिसरात रेल्वे कॅन्टीनच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी जमिनीत गाडला होता

कल्याण : रेल्वेच्या पडीक वसाहतीमध्ये राहण्याच्या वादातून मुकेश पोरेड्डीवार या मित्राची हत्या करणाऱ्या बबलू ऊर्फ गुलामअली बदरे आलमखान आणि अकील अहमद कलीमुद्दीन खान या दोघांनाही महात्मा फुले चौक पोलिसांनी रविवारी अटक केली. दरम्यान, एका भटक्या कुत्र्यामुळे या हत्येचा उलगडा झाल्याचे समोर आले असून, चार तासांतच दोन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मित्रानेच दारूच्या नशेत मुकेशची हत्या करून त्याचा मृतदेह वालधुनी परिसरात रेल्वे कॅन्टीनच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी जमिनीत गाडला होता. या बांधकामाच्या ठिकाणी एक कुत्रा सतत जमीन उकरत असताना काही मजुरांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता जमिनीत काहीतरी गाडले असल्याची बाब समोर आली. तसेच प्रचंड दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे तेथे एका व्यक्तीचा मृतदेह पुरला आहे, अशी माहिती त्यांनी महात्मा फुले चौक पोलिसांना दिली गेली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांनी पोलीस पथक तयार केले. पोलिसांनी काही तासांतच मृतदेह कोणाचा आहे, याचा शोध घेतला.दारूच्या नशेत भांडणमुकेश हा संबंधित ठिकाणी बांधकामाला पाणी मारण्याचे काम करत होता. मुकेश आणि त्याचा सहकारी कामगार मित्र बबलू ऊर्फ गुलामअली हे एकाच खोलीत राहत होते. जेवणानंतर दारूच्या नशेत या दोघांमध्ये बुधवारच्या रात्री भांडण झाले. या भांडणात गुलाम अली याने अकील खान याच्या मदतीने मुकेशला ठार मारले.

टॅग्स :Policeपोलिस