एकावेळी दोन मुलांसोबत होतं मुलीचं अफेअर, जे झालं त्याचा तिने विचारही केला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 14:28 IST2022-09-29T14:28:16+5:302022-09-29T14:28:29+5:30

Crime News : फायरिंगचा आवाज ऐकताच लोक जमा झाले. स्थानिक लोकांनी सांगितलं की, मुलीचं एकवेळी दोन मुलांसोबत अफेअर होतं. 

Story of a girl love affair with two boys together asansol west bengal | एकावेळी दोन मुलांसोबत होतं मुलीचं अफेअर, जे झालं त्याचा तिने विचारही केला नसेल

एकावेळी दोन मुलांसोबत होतं मुलीचं अफेअर, जे झालं त्याचा तिने विचारही केला नसेल

Crime News : पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये एका अल्पवयीन मुलीला दोन तरूणांसोबत प्रेम करणं इतकं महागात पडलं की, ज्याचा तिने कधी विचारही केला नसेल. एका प्रियकराने तिच्या घरी दुसऱ्या प्रियकरावर गोळी झाडून त्याला गंभीर जखमी केलं. गोपालनगरमध्ये सायंकाळी एका प्लॅटमध्ये झालेल्या फायरिंगमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. फायरिंगचा आवाज ऐकताच लोक जमा झाले. स्थानिक लोकांनी सांगितलं की, मुलीचं एकवेळी दोन मुलांसोबत अफेअर होतं. 

सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना दिसलं की, एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. त्याच्याजवळ उभी असलेली 13 वर्षाची मुलगी जोरजोरात रडत होती. स्थानिकांनी सांगितलं की, या घटनेवेळी मुलगी घरी एकटी एकटी होती. स्थानिका लोकांनी सांगितलं की, या घटनेवेळी मुलगी घरात एकटी होती आणि तिचा प्रियकर अंकित बर्मन घरी आला होता. 

जेव्हा याची माहिती मुलीच्या दुसऱ्या प्रियकर उज्वलला मिळाली तेव्हा तो संतापला होता. तो लोडेड पिस्तुल घेऊन मुलीच्या घरी पोहोचला. दोघांना सोबत पाहून त्याने अंकितवर गोळी झाडली आणि फरार झाला. गोळी अंकितच्या गालातून लागून मानेत अडकली. गंभीर स्थितीत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टर म्हणाले की, येणारे काही तास फार महत्वाचे आहेत.

तेच या घटनेनंतर स्थानिकांनी खूप गोंधळ घातला. त्यांनी मुलगी आणि तिच्या आईला अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी आई आणि मुलीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपी उज्वल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच पोलीस घटनेच्या खऱ्या कारणाचा शोध घेत आहेत.

Web Title: Story of a girl love affair with two boys together asansol west bengal