वाहन परवाना काढून देण्यासाठी लाच घेणाऱ्या दलालास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 22:19 IST2019-02-11T22:18:59+5:302019-02-11T22:19:48+5:30
आरटीओ कार्यालयातील दलाल समीर जाधव (26) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज अटक केली आहे.

वाहन परवाना काढून देण्यासाठी लाच घेणाऱ्या दलालास अटक
ठाणे - शिकाऊ आणि कायमस्वरुपी वाहन परवाना काढून देण्यासाठी अडीच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या आरटीओ कार्यालयातील दलाल समीर जाधव (26) याला ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज अटक केली आहे. ठाण्यातील रहिवाशी असलेल्या एका तरुणाने शिकाऊ आणि कायमस्वरुपी वाहन चालक परवाना काढण्यासाठी रितसर ठाण्याच्या आरटीओ कार्यालयाकडे अर्ज केला होता. मात्र, या मर्फी येथील या कार्यालयाच्या बाहेरील दलाल जाधव याने या तरुणाकडून अडीच हजारांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार त्याने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. याच तक्रारीची दखल घेत एसीबीने सापळा लावून जाधवला आज अडीच हजारांची लाच स्वीकारताना अटक केल्याची माहिती सूत्रंनी दिली.