नाच रोखला; पोलिसांपुढे कपडे काढून धिंगाणा, डोंबिवलीच्या पोलिस ठाण्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 10:51 IST2024-01-17T10:48:09+5:302024-01-17T10:51:39+5:30

डोंबिवली टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी रस्त्यावर कार लावून काही तरुण नाच करीत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली.

Stop dancing; Disrobed in front of the police, Dhingana, Dombivli police station type | नाच रोखला; पोलिसांपुढे कपडे काढून धिंगाणा, डोंबिवलीच्या पोलिस ठाण्यातील प्रकार

नाच रोखला; पोलिसांपुढे कपडे काढून धिंगाणा, डोंबिवलीच्या पोलिस ठाण्यातील प्रकार

डोंबिवली : डाेंबिवलीत तरुणांनी धांगडधिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे.  रस्त्यावर कारमध्ये टेप लावून नाच करीत असताना  पोलिसांनी थांबविले. त्याचा त्या तरुणांना इतका राग आला की, ते तरुण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. महिला पोलिसांसमोरच पोलिस ठाण्यात धिंगाणा घातला. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी सहा तरुणांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. 

डोंबिवली टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी रस्त्यावर कार लावून काही तरुण नाच करीत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी बीट मार्शल पोहोचले. त्यांनी कारमधील मोठ्या आवाजातील टेप बंद केला आणि  पोलिस ठाण्यास आले. त्यांच्या मागोमाग डान्स करणारे तरुण पोलिस ठाण्यामध्ये पोहोचले. 

सहा जणांना अटक
अंगावरील कपडे काढून ते महिला पोलिसांसमोरच नाचू लागले. तरुणांचे हे कृत्य पाहून पोलिसही हैराण झाले. या तरुणांना आवर घालणे पोलिसांच्या नाकीनऊ आले. कसेबसे पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी  विलास भुंजग, राजू भुजंग, सिद्धार्थ गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली आहे. यामधील विलास भुजंग याच्याविरोधात यापूर्वी पोलिस ठाण्यात पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: Stop dancing; Disrobed in front of the police, Dhingana, Dombivli police station type