शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या गाडीवर दगडफेक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 20:37 IST

गोलेगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत गाढवदरा येथे गाडी आली असता, मोटारसायकलवरून चार जण आले आणि त्यांनी पवार यांच्या या गाडीवर तुफान दगडफेक केली

ठळक मुद्देअंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर फरार

शिरूर  : गोलेगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात माहिती अशी की, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी कै. शरद जोशी यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद आटपून शरद जोशी विचार मंचचे अध्यक्ष विठ्ठल पवार, उसदर नियामक मंडळाचे सदस्य शिवानंद दरेकर व कामगार आघाडीचे जिल्हाप्रमुख हिरामण बांदल हे निमोणेहुन शिरूरकडे निघाले होते.गोलेगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत ७.३०च्या दरम्यान गाढवदरा येथे गाडी आली असता, पाठीमागुन दोन मोटारसायकलवरून चार जण आले आणि त्यांनी पवार यांच्या या गाडीवर तुफान दगडफेक केली. तसेच अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पळुन गेले. या दगडफेकीत गाडीच्या काचा फुटल्या असुन मागे बसलेले शिवानंद दरेकर यांना मुका मार लागला आहे. या घटनेनंतर पवार यांनी शिरूर पोलिस स्टेशनला फोन केला असता शिरूर पो. स्टे. चे पी.आय.कैलासराव घोडके, अतिरिक्त पी.आय. मुंडे हे आपल्या सहका-यासोबत त्वरीत घडनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाहुन गाडीच्या फुटलेल्या काचा व काही दगड हस्तगत केले आहे. या घटनेची शिरूर पो. स्टे. ला तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

टॅग्स :ShirurशिरुरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFarmerशेतकरी