मुथ्थुट फायनान्समध्ये चोरीचा प्रयत्न; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 21:07 IST2019-05-13T21:03:45+5:302019-05-13T21:07:56+5:30
दोन चोरांकडून शनिवारी पहाटे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

मुथ्थुट फायनान्समध्ये चोरीचा प्रयत्न; गुन्हा दाखल
नालासोपारा - नायगाव पूर्वेकडील जूचंद्र गावातील मुथ्थुट फायनान्स कंपनीच्या कार्यालयात दोन चोरांकडून शनिवारी पहाटे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी चोरी करण्यासाठी आलेले दोघे चोरटे मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
जूचंद्र गावात मुथ्थुट फायनान्स कंपनीचे कार्यालय असून शनिवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास दोन चोरट्यांनी शटर तोडून आतमध्ये घुसले. पण चोरी करण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झाले नाही. चोरांनी कार्यालयाचे गुटर अलार्म, मोशन डिटेक्टर आणि काच फोडून नुकसान केले आहे. ब्रँच मॅनेजर जगदीश पांडुरंग हरड (२९) यांनी वालीव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.