भाईंदरच्या जैन मंदिरातील देवाचा मुकुट चोरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 20:36 IST2023-01-29T20:36:02+5:302023-01-29T20:36:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क येथील जैन मंदिरातील देवाच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट चोरण्यात आला. येथील साई जेसल ...

भाईंदरच्या जैन मंदिरातील देवाचा मुकुट चोरला
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क येथील जैन मंदिरातील देवाच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट चोरण्यात आला.
येथील साई जेसल इमारतीच्या शेजारी जगवलप अचलगत जैन हे जैन मंदिर आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास मंदिरात पुजारी हे लोकांना दर्शन सुरू करण्यासाठी पूजा अर्चना करून दुसऱ्या कामात व्यस्त होते.
सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान मंदिरात अज्ञात व्यक्तीने तीन मूर्तीपैकी एका मूर्तीच्या डोक्यावरील चांदीचे ७५० ग्रामचा व ५० हजार किमतीचा चांदीचा मुकुट दिसून आला नाही. मुकुट खाली पडला असावा म्हणून शोध घेतला असता सापडला नाही.
अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची खात्री होताच मंदिराचे विश्वस्त तेजस गडा यांच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.