मुंबईत इंपोर्टेड सिगारेटचा साठा हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 01:07 IST2020-09-02T01:06:54+5:302020-09-02T01:07:31+5:30
एका मेडिकलमध्ये इंपोर्टेड सिगारेटची विक्री केली जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी रविवारी त्या ठिकाणी धाड टाकली.

मुंबईत इंपोर्टेड सिगारेटचा साठा हस्तगत
मुंबई : इंपोर्टेड सिगारेटची चढ्या भावाने विक्री करणाऱ्या मेडिकलवर एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकली आहे. यात मोठ्या प्रमाणात सिगारेट हस्तगत करण्यात आल्याची माहिती असून अधिक तपास सुरू आहे. अंधेरी पूर्व परिसरात असलेल्या एका मेडिकलमध्ये इंपोर्टेड सिगारेटची विक्री केली जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी रविवारी त्या ठिकाणी धाड टाकली.
त्यांनी शेकडो सिगारेटचे खोके हस्तगत केले असून त्याची किंमत लाखो रुपये असल्याचे समजते. या सिगारेटची विक्री अनधिकृतपणे चढ्या भावाने केली जात असल्याचे पोलिसांना समजले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे़