शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उंची परदेशी सिगारेटचा ९ लाखांचा साठा हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 20:49 IST

पब व पंचतारांकित हॉटेलमध्ये परदेशी बनावटीच्या सिगारेट विक्रीचा धंदा राजरोजपणे सुरु ठेवला होता़... 

ठळक मुद्देखंडणीविरोधी पथकाची कारवाई : तिघे जण ताब्यात

पुणे : उच्च प्रतीच्या परदेशी सिगारेटचा साठा बाळगणाऱ्या तिघा जणांना खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ९ लाख रुपयांच्या बेकायदेशीर सिगारेटी जप्त केल्या आहेत़. शहरातील पब आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये ते या सिगारेटची विक्री करीत असत़. उमर फाऊख शेख (वय ४०), महंमद आफजल युसुफ (वय २०) आणि हिदायतुल्ला खुशमुदुल्ला खान  (वय ४०, सर्व रा़ लाल देऊळ सोसायटी, लष्कर) अशी या तिघांची नावे आहेत़. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांना लाल देऊळाच्या मागे असलेल्या सोसायटीतील एका छोट्या खोलीत बेकायदेशीर सिगारेटचा साठा ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा घालून सिगारेटचा मोठा साठा जप्त केला आहे़. शासनाच्या निर्णयानुसार सिगारेटच्या पाकिटावरील ८५ टक्के भागावर धोक्याचा वैधानिक इशारा छापण्याचे बंधन घालण्यात आले आहे़. यातील सिगारेटवर असा कोणताही वैधानिक इशारा छापण्यात आलेला नाही़. या सर्व सिगारेट परदेशातून आयात करण्यात आल्या आहेत़. या तिघांवर जाहिरातीस प्रतिबंध व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण अधिनियम सन २००३ व २००४चे कलमानुसार खटला दाखल करण्यात आला असून त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र मोहिते यांनी दिली़. उमर फाऊख शेख याच्यावर एक वर्षापूर्वी अशाच प्रकारच्या सिगारेटचा बेकायदेशीरपणे साठा केल्याबद्दल अन्न व औषध विभागाने कारवाई केली होती़. त्यानंतर त्याने जागा बदलून पुन्हा पब व पंचतारांकित हॉटेलमध्ये परदेशी बनावटीच्या सिगारेट विक्रीचा धंदा राजरोजपणे सुरु ठेवला होता़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक