नवी मुंबई - ऐरोली येथे राहणाऱ्या दोन सख्या बहिणींची आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. बंद घरातून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीवरून पोलीसांनी दरवाजा उघडला असता हा प्रकार समोर आला. आई वडिलांच्या निधनापासून दोघी बहिणी त्याठिकाणी एकट्याच राहत होत्या.ऐरोली सेक्टर 10 येथील सागरदर्शन सोसायटीत हा प्रकार घडला आहे. लक्ष्मी पांत्री (33) व स्नेहा पांत्री (26) अशी आत्महत्या केलेल्या दोन बहिणींची नावे आहेत. त्यांच्या आई वडिलांचे 8 वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. तेंव्हापासून या दोघीच त्याठिकाणी रहायला होत्या. याच सोसायटीत त्यांचा इतर एक फ्लॅट असून तो अनेक वर्षांपासून बंदच ठेवलेला आहे. उदरनिर्वाहाचा या दोघी बहिणी घरी शिकवणी घ्यायच्या असेही समजते. त्यामुळे आर्थिक चाचणीतून त्यांनी आत्महत्या केल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद असून आतमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडून आली होती. त्यानुसार सोमवारी रात्री रबाळे पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला असता, एकीचा बेडरूममध्ये तर दुसरीचा हॉलमध्ये मृतदेह आढळून आला.घणसोली गाव परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीने घरात आत्महत्या केली आहे. घरात कोनीनसताना हा प्रकार घडला. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण पोलीसांनाकळू शकलेले नाही.ऐरोली येथील खाडीत बेवारस मृतदेह आढळला. खाडीच्या पाण्यात मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून त्याची ओळख पटलेली नाही.
फ्लॅटमधून येत होता दुर्गंध; दरवाजा उघडला तर लटकत होते दोघी बहिणींचे मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 15:19 IST
Death bodies of the two sisters were hanging : बंद घरातून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीवरून पोलीसांनी दरवाजा उघडला असता हा प्रकार समोर आला.
फ्लॅटमधून येत होता दुर्गंध; दरवाजा उघडला तर लटकत होते दोघी बहिणींचे मृतदेह
ठळक मुद्दे ऐरोली सेक्टर 10 येथील सागरदर्शन सोसायटीत हा प्रकार घडला आहे. लक्ष्मी पांत्री (33) व स्नेहा पांत्री (26) अशी आत्महत्या केलेल्या दोन बहिणींची नावे आहेत.