Steal at the house of senior actress Shubha Khote | ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या घरी चोरी
ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या घरी चोरी

ठळक मुद्देयोगीराज आनंद पुजारी (१९) असे अटक नोकराचे नाव आहे. तो मूळचा सिंधुदुर्गचा रहिवासीमंगळवारी खोटे यांच्या घरातून दीड लाखांचा ऐवज चोरीस गेला. पोलिसांनी ५० हजारांची रोकड हस्तगत केली.

मुंबई - ज्येष्ठ  अभिनेत्री शुभा खोटे यांच्या घरी लाखोंचा डल्ला मारण्यात आल्याचे बुधवारी उघडकीस आले. जुहू पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या घरी काम करणाऱ्या नोकराला अटक करून चोरीचा ऐवज हस्तगत केला आहे.
योगीराज आनंद पुजारी (१९) असे अटक नोकराचे नाव आहे. तो मूळचा सिंधुदुर्गचा रहिवासी असून, जुहूत राहणाऱ्या खोटे यांच्याकडे काम करायचा आणि तिथेच राहायचा. मंगळवारी खोटे यांच्या घरातून दीड लाखांचा ऐवज चोरीस गेला. ही बाब लक्षात येताच, खोटे यांनी जुहू पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी चौकशीदरम्यान पुजारीला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र, नंतर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी ५० हजारांची रोकड हस्तगत केली. चोरी करून तो पळण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली.

English summary :
Robbery at Veteran actress Shubha Khote's house. On Wednesday(17-april-2019), Juhu police has arrested a houshold worker with stolen property. Yogiraj Anand Pujari (19) is named of the worker.


Web Title: Steal at the house of senior actress Shubha Khote
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.