ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या घरी चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:27 IST2019-04-18T16:24:23+5:302019-04-18T16:27:15+5:30
घरी काम करणाऱ्या नोकराला अटक करून चोरीचा ऐवज हस्तगत केला आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या घरी चोरी
मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या घरी लाखोंचा डल्ला मारण्यात आल्याचे बुधवारी उघडकीस आले. जुहू पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या घरी काम करणाऱ्या नोकराला अटक करून चोरीचा ऐवज हस्तगत केला आहे.
योगीराज आनंद पुजारी (१९) असे अटक नोकराचे नाव आहे. तो मूळचा सिंधुदुर्गचा रहिवासी असून, जुहूत राहणाऱ्या खोटे यांच्याकडे काम करायचा आणि तिथेच राहायचा. मंगळवारी खोटे यांच्या घरातून दीड लाखांचा ऐवज चोरीस गेला. ही बाब लक्षात येताच, खोटे यांनी जुहू पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी चौकशीदरम्यान पुजारीला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र, नंतर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी ५० हजारांची रोकड हस्तगत केली. चोरी करून तो पळण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली.