शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

तुम्ही आहे तेथेच थांबा! तिकडच्याच कारागृहात हजर राहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 19:25 IST

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह अनेक कैद्यांना कारागृह प्रशासनाचे आदेश

ठळक मुद्देविशेष म्हणजे नागपूर कारागृहातून अभिवचन रजेवर बाहेर गेलेल्या कैद्यांमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याचाही समावेश आहे.   संचित रजेची मुदत २१ ते २८ दिवसांची असते. तर अभिवचन रजेची मुदत ४५ दिवसांपर्यंत मिळते.

नरेश डोंगरेनागपूर : अभिवचन आणि संचित (पॅरोल आणि फरलो) कारागृहातून बाहेर पडलेल्या कैद्यांना नमूद मुदतीनंतर त्यांच्या त्यांच्या शहरातील कारागृहातच जमा होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश देण्यात आलेल्या कैद्यांमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचाही समावेश आहे.

न्यायालयाने गुन्ह्यात शिक्षा ठोठावल्या नंतर कारागृहात डांबलेल्या कैद्याला वर्षातून एकदा संचित रजेचा तर वर्षातून दोन वेळा अभिवचन रजेचा लाभ मिळतो. संचित रजेची मुदत २१ ते २८ दिवसांची असते. तर अभिवचन रजेची मुदत ४५ दिवसांपर्यंत मिळते. नमूद रजेत संबंधित कैदी आपल्या गावात, आपल्या कुटुंबात जाऊ शकतो. विशिष्ट मुदतीनंतर त्याला कारागृहात परत यावे लागते.

अपवादात्मक कारण वगळता तो कैदी नमूद तारखेवर परतला नाही तर त्याला पोलीस अटक करून कारागृहात डांबतात. त्यानंतर त्याला संचित किंवा अभिवचन रजेचा लाभ मिळत नाही. प्रत्येक कारागृहात विविध कैद्याच्या संबंधाने संचित आणि अभिवचन वचन रजेवर सोडण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते. गेल्या महिनाभरात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून १२ कैदी संचित आणि अभिवचन रजेवर त्यांच्या त्यांच्या गावी गेले आहेत. संचित रजेवर जाणारांची संख्या दोन असून त्यातील एक मुंबईचा तर दुसरी नागपूरचा आहे.तर अभिवचन रजेवर गेलेल्या १० कैद्यांमध्ये कोथरूड पुणे येथील १, वर्धा येथील १, मुंबई येथील २, गडचिरोली येथील ३ आणि नागपूर येथील ३ कैद्यांचा समावेश आहे. हे कैदी रजेवर कारागृहातून बाहेर गेल्यानंतर लॉकडावून सुरू झाले आणि त्यामुळे एका वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झाली.  बाहेरून येणाऱ्या कैद्यामुळे कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या. राज्य कारागृह प्रशासनाने अभिवचन आणि संचित रजेवर बाहेर गेलेल्या कैद्याच्या संबंधानेही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार ज्या शहरातील कैदी कारागृहातून बाहेर गेले त्यांनी त्याच शहराच्या कारागृहात नमूद अवधीनंतर हजर (जमा) व्हायचे आहे. अर्थात नागपूरचा कैदी मुंबईला गेला तर त्याने परत नमूद मुदतीनंतर नागपूरच्या कारागृहात नव्हे तर मुंबईच्याच कारागृहात जमा व्हावे, असा हा आदेश आहे. विशेष म्हणजे नागपूर कारागृहातून अभिवचन रजेवर बाहेर गेलेल्या कैद्यांमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याचाही समावेश आहे. 

तो १२ मार्चला अभिवचन रजेवर बाहेर गेला असून २७ एप्रिलला त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात परत यायचे होते. परंतु नव्या निर्णयानुसार त्याला स्थानिक कारागृह प्रशासनाने नागपूरला यायचे नाही, मुंबईच्याच कारागृहात २७ एप्रिलला जमा व्हावे, असे आदेश दिले असल्याची माहिती कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांनी लोकमतला दिली.जेलयात्रा थांबलीलॉकडाऊन पूर्वी येथील मध्यवर्ती कारागृहातून रोज ४० ते ५० कैदी बाहेर जायचे. यातील काहींची तारीख असायची तर काहींच्या जामीन अर्जावर सुनावणी असल्यामुळे त्यांना न्यायालयात पाठविण्यात येत होते. त्यातील किमान पंचवीस ते तीस कैदी परत कारागृहात येत होते. वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक झालेल्या आणि न्यायालयाच्या आदेशानुसार कोठडी देण्यात आलेल्या दहा ते पंधरा कैद्यांचीही रोज कारागृहाच्या एन्ट्री व्हायची. लॉकडाऊन मुळे ही प्रक्रियाच थंड पडली असून आता फार फार तर दोन किंवा तीन कैदी आत मध्ये येतात.  त्यांची कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच तपासणी केली जाते. आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय त्यांना आत घेतले जात नाही. थोडाही संशय आल्यास त्यांना कारागृहाच्या प्रवेशद्वारावरून थेट मेडिकलमध्ये पाठवण्यात येते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येते, असे अनुप कुमरे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :jailतुरुंगnagpurनागपूरArun Gawliअरुण गवळीcorona virusकोरोना वायरस बातम्या