शिवीगाळीबद्दल जाब विचारल्याने चाकूने वार; आरोपी पसार, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 08:59 IST2023-08-22T08:59:21+5:302023-08-22T08:59:43+5:30

गणेशच्या डाव्या गालावर वार अभय तिथून पसार

Stabbed for questioning about abuse | शिवीगाळीबद्दल जाब विचारल्याने चाकूने वार; आरोपी पसार, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा

शिवीगाळीबद्दल जाब विचारल्याने चाकूने वार; आरोपी पसार, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : आदल्या दिवशी झालेल्या भांडणाची पोलिस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून अन्नपूर्णा दुकानाचे मालक प्रदीप करडे यांना अभय मोरे याने शिवीगाळ केली होती. याचाच जाब विचारणाऱ्या गणेश शेलार (३०, रा. पाचपाखाडी, ठाणे) याच्या डाव्या गालावर अभय याने चाकूने खुनीहल्ला केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी २० ऑगस्टला अभय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी सोमवारी दिली.

ठाण्याच्या पाचपाखाडीतील रहिवासी गणेश याने दिलेल्या तक्रारीनुसार १९ ऑगस्ट रोजी दुपारी अन्नपूर्णा दुकानाचे मालक प्रदीप करडे (५१) यांचे अभय मोरे याच्याबरोबर भांडण झाले होते. त्या बाबत त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रारही केली होती. त्याच दिवशी (१९ ऑगस्टला) रात्री ८.३० च्या सुमारास करडे हे त्यांच्या दुकानातील कामगार गणेश शेलार यांना घेऊन दुकानाजवळ आले. तेव्हा अभय तिथे आला होता त्याने करडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा गणेशने त्यांना शिवीगाळ का करतोस? अशी विचारणा केली. त्यानंतर मात्र त्याने गणेशच्या पोटावर वार केला. तो चुकवून त्याला पकडण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु, त्याने गणेशच्या डाव्या गालावर वार करुन तिथून पसार झाला.

Web Title: Stabbed for questioning about abuse