शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमधून थुंकणं जिवावर बेतलं, मुंब्य्राच्या दोन तरुणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 21:28 IST

सरफराज समीर खान (वय - १७), अमन सय्यद (वय - १९) यांचा मृत्यू

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या जलद लोकलमधून थुंकण्यासाठी बाहेर डोकावताना तोल गेल्यामुळे रुळावर पडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तसेच त्याच्यासोबत प्रवास करत असलेला त्याचा मित्र १९ वर्षीय अमन सय्यद हा देखील गंभीर जखमी झाला होता. त्याचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावदनकर यांनी दिली. 

सरफराज समीर खान (वय - १७), अमन सय्यद (वय - १९) आणि अजून एक मित्र काल मुंब्र्याहून दक्षिण मुंबईतील एका दर्ग्यात दर्शनासाठी आले होते. मुंब्याहून त्यांनी स्लो लोकल पकडली होती. नंतर घाटकोपर रेल्वे स्थानकावर उतरून त्यांनी  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारी जलद लोकल पकडली होती. प्रवासादरम्यान रात्री साडेनऊच्या सुमारास सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान सरफराज थुंकण्यास झुकला आणि त्याचा हात सुटून तोल गेला. त्याच्यासोबत लोकलच्या दरवाज्यात उभा असलेला मित्र अमन देखील गंभीर जखमी झाला होता. सरफराज जागीच ठार झाला होता. तर उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यांच्यासोबत अजून एक मित्र प्रवास करत होता. तो मात्र वाचला आणि त्यानेच घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. दोघांचेही पालक शोकाकुल झाले होते असल्याची माहिती  हेमंत बावदनकर  यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईrailwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यू