शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारने घेतला भावंडाचा बळी; हॉटेल व्यवसायिक रोहन अबॉटला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 19:00 IST

Hit And Run Case : अपघातानंतर पळून गेल्यानंतर सोमवारी सकाळी त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. 

ठळक मुद्दे भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील अक्षय गवरे व संकेत गवरे या भावंडाचा जागीच मृत्यू झाला होता.

नवी मुंबई : पामबीच मार्गावरील हिट अँड रन प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी रोहन अबॉट याला अटक केली आहे. तो अबॉट हॉटेलचा व्यवस्थापक असून घटनेवेळी कार चालवत होता. अपघातानंतर पळून गेल्यानंतर सोमवारी सकाळी त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. 

शनिवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावर एपीएमसी हा भीषण अपघात घडला होता. भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील अक्षय गवरे व संकेत गवरे या भावंडाचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र अपघातानंतर मर्सिडीज कार घटनास्थळीच सोडून चालकाने पळ काढला होता. याप्रकरणी एपीएमसी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कार चालकाचा शोध घेत होते.

अखेर सोमवारी सकाळी रोहन अबॉट याने स्वतःला एपीएमसी पोलिसांच्या स्वाधीन केले. वाशीतील अबॉट हॉटेलचा तो व्यवस्थापक आहे. अपघातावेळी तो गाडीत एकटाच होता अशी कबुली त्याने दिल्याचे उपनिरीक्षक पंकज महाजन यांनी सांगितले. दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. मयत अक्षय व संकेत हे टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी निलेश गवरे यांची मुले आहेत. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसhotelहॉटेल