शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
2
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
3
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
4
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
5
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
6
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
7
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
8
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
9
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
10
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
11
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
12
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
13
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
14
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
15
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
16
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
17
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?
18
दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी
19
या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय
20
काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...

सांताक्रूज- पणजी येथे पुन्हा गँगवॉर; एक ठार, अनेकांची धरपकड 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 1:02 PM

पोलीसांनी धरपकड सुरू करण्यात आली असून काही गँगस्टर सीसीटीव्ही कॅमºयातही कैद झाले आहेत. 

पणजी:  सांताक्रूझ - पणजी  येथे पहाटे ३ दरम्यान  दोन गँगमधील मारामारीत एका गँगमधील माणसाला गोळी लागून तो ठार झाला. पोलीसांनी धरपकड सुरू करण्यात आली असून काही गँगस्टर सीसीटीव्ही कॅमºयातही कैद झाले आहेत. 

ही घटना शनिवारी पहाटे ३ ते ३.३० च्या दरम्यान घडली. मेरशे येथे इम्रान बेपारी नामक इसमाच्या घरावर २० ते २५ जणांच्या गटाने अचानक हल्ला केला. त्हल्लेखोर  मोटरसायकलीवरून आले होते आणि कोयता तलवारी वगैरे शस्त्रे घेऊन आले होते. यांच्याकडून गोळीबार व दगडफेक सुरू होता. घराबाहेर असलेली कारगाडीही कोयते व दगड घालून मोडतोड करून टाकली. मोडतोडीचा आवाज ऐकून घरातील लोक  सावध झाले आणि त्यांनीही उलट हल्ला चढविला.  या मारामारीत एकाला गोळी लागली आणि तो मरण पावला. ठार झालेल्याचे नाव सोनू यादव असे असून तो मेरशी भागातील एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि गँगस्टर म्हणून ओळख  असलेल्या व्यक्तीशी संबंधित आहे.  

महतत्वाचे म्हणजे  ठार झालेला माणूस हा हल्लेखोरांपैकीच असून त्याला गोळी लागल्यामुळे तो ठार झाला. त्याचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलीस अधीक्षक उत्कृष्ठ प्रसुन यांनी दिली आहे.  त्याच्यावर कुणी गोळी झाडली हे अद्याप उघड झालेले नाही. इम्रान बेपारी समर्थकांचे म्हणणे आहे आहे की त्यांनी प्रतिहल्ला चढविताना गोळीबार केला नव्हता. बाटल्या फेकून मारल्या होत्या असे ते म्हणतात.  हल्लेखोरांनी वापरलेल्या ब ंदुका या कट्टा पद्धीच्या होत्या, त्यामुळे चुकून बँकफायर होवून स्वत:वरच गोळी झाडली गेल्याचीही शक्यता पोलीस नाकारत नाहीत.  या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत अनेकांची धरपकड केली आहे. सांताक्रुज - मेरशी भागात गँगवॉरचा काळा इतिहास असून यापूर्वी ही याठिकाणी अनेक गँगवॉर व खून दरोडे झालेले आहेत. 

दरम्यान  ज्याच्यावर हल्ला झाला तो इम्रान बेपारी याचाही गुन्हेगारी जगताशी स ंबंध असून त्याच्यावर अनेक गुन्हेही नोंद असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.  या प्रकरणात पोलीस तपास करीत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस