शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सोनू सूदने अपघातात मरण पावलेल्या डिलेव्हरी बॉयच्या कुटुंबियांना दिला मदतीचा हात 

By पूनम अपराज | Updated: December 18, 2020 19:00 IST

Accidental Death : या प्रकरणात ओशिवरा पोलिसांनी कार चालक तैफूर तन्वीर शेख याला ताब्यात घेतले आहे, तो वय 19 वर्षांचा आहे.

ठळक मुद्दे सतीश झोमॅटो या कंपनीमध्ये काम करत होता. काल रात्री अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात सतीश पारसनाथ गुप्ता  याच्या दुचाकीस आलिशान चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली.

लॉकडाऊनदरम्यान बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने हजारो परप्रांतीय कामगारांना मदत करून अनेकांची मने जिंकली. आता तो एका कुटुंबास आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. वास्तविक, काल रात्री जोरात वेगाने येणाऱ्या मर्सिडीज कारने दुचाकीस धडक दिल्याने एका 19 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती सोनू सूद याला समजताच त्याने मृतांच्या कुटूंबाशी संपर्क साधला आणि आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. सतीश गुप्ता असं मृत दुचाकीस्वाराने नाव आहे.  या प्रकरणात ओशिवरा पोलिसांनी कार चालक तैफूर तन्वीर शेख याला ताब्यात घेतले आहे, तो वय 19 वर्षांचा आहे.

सतीश झोमॅटो या कंपनीमध्ये काम करत होता. काल रात्री अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात सतीश पारसनाथ गुप्ता  याच्या दुचाकीस आलिशान चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. त्यानंतर ताबडतोब सतीशला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान त्याचा मृत्यू झाला

ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद बांगर म्हणाले की, अटक आरोपी तैफुर तनवीर शेख हा विद्यार्थी आहे आणि कारला ओव्हरटेक करत असताना त्यांच्या गाडीचा ताबा सुटला आणि सतीशच्या दुचाकीला जोरदार धडक त्याने दिली. पोलिसांनी शेखविरोधात भादंवि कलम२७९, ३०४ (ए) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १९६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शेखचे वडील व्यापारी असून ड्राय फ्रूट्सची निर्यात करतात. तसेच या प्रकरणात तातडीने हालचाल होण्यासाठी पोलिसांशी बोलणार असल्याचंही सोनू सूदने सांगितलं.

टॅग्स :AccidentअपघातSonu Soodसोनू सूदDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक