शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:13 IST

Sonam Raghuwanshi Latest News: राजावर पहिला वार कोणी केला? स्कूटरवर सोनमची वाट बघत कोण थांबलं होतं? सेल्फी पाईंटवर काय घडलं?

Sonam Raghuwanshi Case: सोनमने राजा रघुवंशीची हत्या कशी केली, याबद्दल काही माहिती पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासातून समोर आली आहे. राजाची हत्या वेई साडोंग धबधब्याजवळील सेल्फी पाईंटवर नेऊन करण्यात आली आहे. सेल्फी पॉईंटवर कुणी पडू नये म्हणून जाळीचे सुरक्षा कवच आहे. चार फूट उंच या संरक्षक कठड्यावरून राजाचा मृतदेह खाली दरीत फेकण्यात आला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आतापर्यंत पोलिसांच्या हाती आलेल्या माहितीनुसार काही गोष्टी समोर आल्या आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल, आकाश आणि आनंद हे त्यांच्या गाड्या घेऊन सोनम आणि राजासोबतच फिरत होते. 

सोनमने सेल्फी पॉईंटवर नेल अन्...

त्यांनी रचलेल्या कटानुसार, दहा किमीवर अंतर चालत गेले की, वेई साडोंम धबधब्याचा सेल्फी पाईंट आहे. तिथे बाजूला पार्किंगही आहे. पार्किंगमध्ये त्यांनी गाड्या उभ्या केल्या. मुख्य रस्तापासून २०० मीटर आत सेल्फी पाईंट आहे. 

वाचा >>"लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन

सोनम आणि राजा तिथे गेले. त्यांच्यासोबत विशाल आणि आकाशही होता. तिथे जाण्यासाठी त्यांना पाच मिनिटे लागली असतील. त्याच्या प्लॅननुसार आनंद स्कूटर घेऊन मुख्य रस्त्यावरच थांबला. कोणी सेल्फी पॉईंटकडे येत आहे का, हे सांगण्यासाठी त्याला तिथे उभे केले होते.  सोनमने इशारा केला, विशालने वार केला

सेल्फी पाईंटवर पोहचल्यानंतर सोनमने विशाल चौहानकडे बघून इशारा केला. त्याने राजाच्या पाठीमागून जात डोक्यात जोरात वार केला. त्यानंतर त्याला मारण्यात आले. अवघ्या काही मिनिटात हे त्यांनी केले. राजाचा मृत्यू झाल्याचे निश्चित केल्यानंतर तिघांनी त्याला ४ फूट उंच लोखंडी जाळीच्या कठड्यावरून खाली दरीत फेकले. 

सूत्रांच्या माहितीनुसार, १८ मिनिटात त्यांनी राजाची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यानंतर आकाश आणि सोनम एकाच स्कूटरवरून निघाले. 

सोनम रघुवंशी अशी पोहचली इंदूरला

विशाल रस्त्यावर थांबलेल्या आनंदसोबत निघाला. सोहरापासून १५ किमी दूर सोहरारिम गावात आकाशने स्कूटर रस्त्याच्या कड्याला उभी केली. स्कूटरला चावी तशीच ठेवली होती. त्यानंतर सोनम टॅक्सीने शिलाँगमधील पोलीस बाजारात पोहचली. आकाश त्याच्या दोन साथीदारांसह निघून गेला. त्यानंतर सोनम गुवाहाटीला गेली. तिथून ती सिलिगुडीला पोहोचली. तिथून सोनमने पटना गाठले. नंतर ती लखनौ मार्गे इंदूरला आली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश