शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:51 IST

Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीच्या हत्येनंतर कुटुंबाने सोनमच्या कुटुंबीयांची नार्को टेस्ट करण्याची मोठी मागणी केली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंदने प्रतिक्रिया दिली आहे.

राजा रघुवंशीच्या हत्येनंतर कुटुंबाने सोनमच्या कुटुंबीयांची नार्को टेस्ट करण्याची मोठी मागणी केली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंदने प्रतिक्रिया दिली आहे. हत्येमागचं नेमकं सत्य बाहेर काढण्यासाठी राजाच्या कुटुंबाने सोनमचे पालक, भाऊ गोविंद आणि वहिणीसह सर्व सदस्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. यावर गोविंद म्हणाला की, आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही. जर कोणाला आमच्यावर संशय असेल तर आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहोत.

राजाच्या कुटुंबाला संशय आहे की, सोनमच्या कारखान्यातील राज कुशवाह हा एकटाच या खळबळजनक हत्येचा मास्टमाईंड असू शकत नाही. मेघालयचे पोलीस महासंचालक (डीजीपी) इदाशिशा नोंगरांग यांनी राजा रघुवंशीच्या हत्येला केवळ लव्ह ट्रँगलपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर इतर सर्व पैलू लक्षात घेऊन पोलीस तपास करत आहेत. लग्नाच्या काही दिवसांतच सोनमच्या मनात पतीबद्दल इतका द्वेष निर्माण होणं सामान्य नाही. आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत आणि सर्व पैलू विचारात घेतले जात आहेत असं म्हटलं आहे.

चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती

मेघालय पोलिसांनी इंदोरमधील सहकार नगर येथील राजा रघुवंशीच्या घरी भेट दिली आणि कुटुंबातील सदस्यांचं जबाब नोंदवलं. राजाचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी म्हणाला की, "मेघालय पोलिसांचं तीन सदस्यांचं पथक आमच्या घरी सुमारे अर्धा तास थांबलं. त्यांनी आम्हाला सोनमच्या वर्तनाबद्दल प्रश्न विचारलं. लग्नानंतर सोनम आमच्या घरी किती दिवस राहिली हे देखील आम्हाला विचारण्यात आलं."

"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

 "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू

मेघालय पोलिसांनी राजाच्या हनिमून ट्रिप दरम्यान झालेल्या हत्येप्रकरणी राजाची पत्नी सोनम, तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाह आणि कुशवाहचे तीन मित्र विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांना अटक केली आहे. राजा आणि सोनम लग्नानंतर शिलाँगला हनिमूनला गेले होते. मात्र तिथे हे कपल अचानक बेपत्ता झालं. काही दिवसांनी राजाचा मृतदेह सापडला. पण सोनम बेपत्ता होती. त्यानंतर सोनमला राजाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक